आता घरच्या घरी बनवा सॅनिटायझर, हॅण्डवॉश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

कोरोनाच्या काळात स्वच्छतेचे, वारंवार हात धुण्याचे व निर्जंतुकीकरणाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. या पार्श्‍वभूमीवर "एपीजी लर्निंग'तर्फे "गुगल मीट' ऍपवरती लाइव्ह होणाऱ्या या कार्यशाळेत सहभागी होऊन स्वच्छता साधने बनवण्याची संधी मिळणार आहे.

पुणे:  कोरोनाच्या काळात स्वच्छतेचे, वारंवार हात धुण्याचे व निर्जंतुकीकरणाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. या पार्श्‍वभूमीवर "एपीजी लर्निंग'तर्फे "गुगल मीट' ऍपवरती लाइव्ह होणाऱ्या या कार्यशाळेत सहभागी होऊन स्वच्छता साधने बनवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ऍक्‍टिव्हेटेड चारकोल, पीच, संवेदनशील त्वचेसाठी कलामाइन व बर्स्टिंग जोजोबा बीड्‌स आदी फेसवॉश, रिलॅक्‍सींग बाथ सॉल्ट, डव्ह बॉडी फोम, अलमन्ड-वालनट-केसर फेस स्क्रब, पेपरमिंट/लेमन ग्रास शॉवर जेल, हर्बल शाम्पू, इंटिमेट वॉश व हॅण्ड सॅनिटायझर आदी प्रकार लाइव्ह बनवण्यास शिकवणार आहेत. ही कार्यशाळा बुधवारी (ता. 15) सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क पंधराशे रुपये.

विपुल भगत यांची ऑनलाइन मेकअप कार्यशाळा
योग्य पद्धतीने मेकअप करणे ही एक कला आहे. आज सर्व वयोगटातील महिलांना मेकअप करणे व नीटनेटके राहणे आवडते. या पार्श्‍वभूमीवर 23 व 24 जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत "गुगल मीट' ऍपवरती टेलिव्हिजन मेकअप आर्टिस्ट विपुल भगत यांची "डू इट युअरसेल्फ' लाईव्ह कार्यशाळा होणार आहे. यामध्ये स्वतःच स्वतःचा मेकअप प्रभावीरीत्या करण्याच्या टिप्स, ट्रिक्‍स व टेक्‍निक शिकवल्या जाणार आहेत. तसेच, मेकअपचे विविध प्रकार शिकवले जातील. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये अधिक जीएसटी.
दोन्ही कार्यशाळांच्या माहितीसाठी संपर्क ः 9350001602

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News