आता ठरवलय बदलायचयं 

वरद इनामदार, वाई
Friday, 13 September 2019

आता ठरवलंय आता बदलायचंय.
आयुष्यात आता मागं कधीच नाही फिरायचंय, 
जीवनात खुप काही करायचंय आपलं अस्तित्व निर्माण करायचंय.
आता फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगायचंय,

आता ठरवलंय बदलायचंय, 
स्वतःला घडवायचंय.
सतत दुसऱ्यांचा विचार करणं सोडायचंय,
माझं आयुष्य आता मला जगायचंय.

आता ठरवलंय आता बदलायचंय, 
आई वडिलांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या ना की.
त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणून दुखवायचंय,
जगात कोण कोणाच नसतं! यावर विश्वास बसायला.
कळायला वेळ जरी लागला तरी आता पुरतं समजलंय, 

आता ठरवलंय आता बदलायचंय.
आयुष्यात आता मागं कधीच नाही फिरायचंय, 
जीवनात खुप काही करायचंय आपलं अस्तित्व निर्माण करायचंय.
आता फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगायचंय,

आता ठरवलय आता बदलायचंय.
केलेल्या चुकांमधून शिकतो तोच खरा माणूस,
मला तो माणूस बनायचंय.
आता त्या स्वप्नांच्या जगातून उतरून मला सत्याच्या आव्हानांशी लढायचंय 
आता बदलायचंय. 
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News