आता फेक मॅसेज शोधणे झाले सोपे; व्हॅट्सअँपने आणलं नवीन फिचर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

व्हॉट्सअँपवर दिवसेंदिवस फेक मॅसेज पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे समाजात द्वेष निर्माण होत आहे, यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअँपने फेक मेसेज शोधण्याचं नवीन फिचर लॅंच केलं आहे.

मुंबई: सोशल मीडियावर सर्वाधिक धुमाकूळ घालणाऱ्या व्हॉट्सॲपने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे, यामध्ये युजर्सना फेक मेसेज पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली, त्यामुळे आता फेक मेसेजला आळा बसण्याची शक्यता व्हाट्सअँपने व्यक्त केली. व्हॉट्सअँपवर दिवसेंदिवस फेक मॅसेज पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे समाजात द्वेष निर्माण होत आहे, यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअँपने फेक मेसेज शोधण्याचं नवीन फिचर लॅंच केलं आहे, त्यामुळे युजर्सना आता फेक मॅसेजची ओळख करणे सोपे जाणार आहे.

कसं पहावं फेक मेसेज 

युजर्सना फॉरवर्ड केलेले मेसेज आल्यानंतर त्या मॅसेज जवळ मॅग्निफाइंग ग्लास आयकॉन असतो. त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर्स थेट ब्राउजरवर घेऊन जाईल, नंतर युजर्सना पाठवलेला मेसेज कोणत्या नंबर वरून अपलोड करण्यात आला याची माहिती मिळेल. या माहितीच्या आधारे युजर्सना त्या मेसेजची सत्यता पडताळता येईल. तसेच काही आर्टिकल व्हॉट्सअॅंपने त्या ब्राउझरवर टाकले आहेत. त्या आर्टिकलमध्ये फेस मॅसेजची सविस्तर माहिती मिळणार आहे, अशाप्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने फेक मेसेजची पडताळणी करता येईल.

सध्या हे फिचर कोठे आहे

अमेरिका, ब्रिटन, स्पेन, मेक्सिको, आयर्लंड, इटली आणि ब्राझील या विकसीत देशातमध्ये हे नवीन फिचर लॉन्च करण्यात आले. मात्र, सध्यातरी भारतामध्ये हे फिचर उपलब्ध नाही. काही दिवसात हे फिचर भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध होईल, अँड्रॉइड आणि आयओएस या फोनमध्ये नवीन फिचर डाऊनलोड करता येईल
अशी माहिती व्हॉट्सअँपने त्यांच्या ब्लॉगवर दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News