आता मोहिम कचरामुक्त ‘स्वच्छ एव्हरेस्ट’ची      

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 May 2019

हिमालय पर्वत रांगेतील एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच व आव्हानात्मक शिखर सर करण्यासाठी जगभरातील गिर्यारोहकांची पावले हिमालयाकडे वळत असतात.

हिमालय पर्वत रांगेतील एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच व आव्हानात्मक शिखर सर करण्यासाठी जगभरातील गिर्यारोहकांची पावले हिमालयाकडे वळत असतात. मात्र येथील पांढऱ्याशुभ्र हिमावर आता कचऱ्यामुळे काळा डाग लागला आहे, अशी खंत नेपाळच्या पर्यटन विभागाचे महासंचालक दंडू राज घिमिरे यांनी व्यक्त केली.

एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच असलेले कचऱ्याचे डंपिग शिखर, अशी ओळख होऊ नये म्हणून नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील पसंगलहमू ग्रामीण नगरपालिकेच्या नेतृत्वाखाली ४५ दिवसांच्या ‘एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमे’ला १४ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. अशी आहे मोहीम दरवर्षी कित्येक टन कचऱ्याची निर्मिती कचऱ्यात ऑक्‍सिजनचे रिकामे सिलिंडर, उर्वरित अन्न, बियरच्या बाटल्या, विष्टा आदींचा समावेश मानवी मृतदेहही खाली आणणार अनेक सरकारी व बिगर सरकारी संस्थांची मदत २ कोटी ३० लाख नेपाळी रुपयांची तरतूद एका गिर्यारोहकामुळे शिखरावर आठ किलो कचरा साचतो. त्या प्रमाणात कचरा खाली आणण्याचे प्रत्येक गिर्यारोहकावर २०१४ मध्ये बंधन होते

येत्या २९ मे रोजी सांगता. याच दिवशी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केला होता. एव्हरेस्टवरील खडक व बर्फ वगळून सर्व काही परत आणले जाईल. हे शिखर प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे - टीकाराम गुरुंग, सरचिटणीस, नेपाळ माउंटेनिअरिंग असोसिएशन

मोहिमेत आतापर्यंत (आकडे किलोग्रॅममध्ये)
 १०,००० : कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट
 ५,००० : बेसकॅपवरून कचरा गोळा करणार
 २,००० : साऊथ कोल भागातून गोळा करणार
 ३,००० : बेसकॅंप दोन व तीन भागातून करणार
 ३,००० : दहा दिवसांत गोळा केलेला कचरा
 २,००० : विल्हेवाटीसाठी ओखलडुंगात रवाना
 १,००० : काठमांडूला रवाना

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News