नोव्हाक जोकोविच यू एस ओपन खेळण्यास सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा आगामी अमेरिकन ओपन म्हणजेच यू एस ओपन ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहे.
  • याआधी कोरोनाचा धोका असल्यामुळे अनेक बड्या टेनिसपटूंनी स्पर्धेत भाग न घेण्याचे जाहीर केले आहे.

न्यूयॉर्क :- नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा आगामी अमेरिकन ओपन म्हणजेच यू एस ओपन ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. याआधी कोरोनाचा धोका असल्यामुळे अनेक बड्या टेनिसपटूंनी स्पर्धेत भाग न घेण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये राफेल नडाल, रॉजर फेडरर, अँडी मरे, महिला खेळाडू एश्‍ले बार्टी, अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. "मी पण स्पर्धेतून माघार घेण्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलोच होतो. पण नंतर मी असा विचार केला की, मला खेळायचे आहे. वैयक्तिक स्तरावर मी धाडसी निर्णय घ्यायला अजिबात घाबरत नाही. मला जर यात खूपच धोका वाटला असता तर मी नक्कीच स्पर्धेत सहभागी झालो नसतो,' असे जोकोविच म्हणाला. याव्यतिरिक्त जोकोविचच्या नावावर १७ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News