कोकण विद्यापीठ नाहीच; विद्यार्थ्यांनी दिला कोकण विद्यापीठाला नकार

यिनबझ टीम
Friday, 21 February 2020

सध्या विद्यार्थ्यांकडूनच कोकण विद्यापीठाला विरोध केला जात असल्याने त्याबद्दलचा विचार राज्य सरकार थांबवणार असल्याचे दिसून येत आहे, मात्र कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाठी 350 किमी प्रवास करून मुंबईमध्ये यावे लागते. तो त्रास कमी व्हावा यासाठी कोकणमध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र उभारणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोकण विद्यापीठ नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून केलेल्या सर्वेमध्ये अनेक प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांचा संपुर्ण कल मुंबई विद्यापीठाकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोकण विद्यापीठ हवे की नको, याच्या सर्वेसाठी गठित केलेली समिती लवकरच कोकण विद्यापीठाच्या नकाराचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करणार आहे.

मुंबई विद्यापीठात सद्यस्थितीला 840 महाविद्यालये आणि 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक समिती गठित केली.

समितीच्या मार्फत एक अॅप लॉंच करण्यात आले, त्या अॅपच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वे करण्यात आला. सर्वेमध्ये असे अढळून आले की 100 पैकी 87 प्राचार्यांचा आणि 200 पैकी 180 विद्यार्थ्यांचा नवीन होणाऱ्या कोकण विद्यापीठाला विरोध आहे. तर 200 पैकी फक्त 20 विद्यार्थ्यांना आणि 100 पैकी फक्त 04 प्राचार्यांना नव्या कोकण विद्यापीठाची संकल्पना मान्य आहे. त्यामुळे अखेर कोकण विद्यापीठासाठी चक्क विद्यार्थी आणि प्राचार्यांकडून विरोध दर्शवला जात असल्याचे म्हटले जात आहे.

कोकणात उभारणार मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र
सध्या विद्यार्थ्यांकडूनच कोकण विद्यापीठाला विरोध केला जात असल्याने त्याबद्दलचा विचार राज्य सरकार थांबणार असल्याचे दिसून येत आहे, मात्र कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाठी 350 किमी प्रवास करून मुंबईमध्ये यावे लागते. तो त्रास कमी व्हावा यासाठी कोकणामध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र उभारणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या केंद्रात पुर्णवेळ संचालक पदावर अधिकारी कार्यरत असतील, तसेच मुंबई विद्यापीठाची अनेक कामे विद्यार्थी या केंद्रातून करतील, अशी सोय इथे करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News