'कोरोना गो' नाही तर 'कोरोना प्यार है', बॉलीवूडमध्ये लवकरच निघणार 'कोरोना'वर आधारित चित्रपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020
  • चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता संपूर्ण जगात पसरला आहे. भारत, इटली, इराणसह जगात अशी अनेक देशे आहेत जिथे कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आता कोरोनाने बॉलिवूडवरही परिणाम केला आहे. तथापि, कोरोनाच्या भीतीपोटी बॉलिवूडही थोडा सक्रिय झाला आहे.

चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता संपूर्ण जगात पसरला आहे. भारत, इटली, इराणसह जगात अशी अनेक देशे आहेत जिथे कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आता कोरोनाने बॉलिवूडवरही परिणाम केला आहे. तथापि, कोरोनाच्या भीतीपोटी बॉलिवूडही थोडा सक्रिय झाला आहे.

बॉलिवूडने कोरोना विषाणूशी संबंधित आगामी चित्रपटासाठी नोंदणी केली आहे. टीओआयच्या अहवालानुसार, इरोस इंटरनेशनलने 'कोरोना प्यार है' या नावाने चित्रपटाची  नोंदणी केली आहे. हे नाव  'कहो ना प्यार है' या चित्रपटासारखं  वाटत आहे. अहवालात इरोस इंटरनेशनलच्या कृशिका लुल्लाच्या मार्फत असे सांगण्यात आले आहे की, सध्या या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे.तसेच देशातील भीतीचं वातावरण सावरलं की, चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली जाईल असेही ते म्हणाले. 

फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका सूत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इरोज इंटरनेशनलने गेल्या आठवड्यात 'कोरोना प्यार है' या चित्रपटाचे नाव नोंदविले आहे.त्याचप्रमाणे  या अहवालात असेही  म्हटले आहे की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशन या दुसर्‍या फिल्म संस्थेनेही  असे सांगितले आहे की, अनेक चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी कोरोनाशी संबंधित नावे नोंदविली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूने जगभरात थैमान माजवलं आहे. संपूर्ण जगभरात आतापर्यंत सहा हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.तसेच  आतापर्यंत 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद भारतात झाली आहे.दरम्यान  यात दोन लोकांचा मृत्यूही झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News