नोराचे डान्सिंग कौशल्य टिकटॉकवर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या वेगवेगळ्या डान्सिंग व्हिडीओज ती शेअर करत आहे.

दिलबर, ओ साकी साकी यांसारख्या गाण्याने अवघ्या बॉलीवूडला वेड लावणारी नोरा फतेही सध्या सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या वेगवेगळ्या डान्सिंग व्हिडीओज ती शेअर करत आहे.

आता टिकटॉक या ऍपवरही नोराची भर पडली आहे. शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मासारखे कलाकार टिकटॉकवर सध्या चर्चेचा विषय ठरत असताना नोराचीही आता यामध्ये एण्ट्री झाली आहे. तिने टिकटॉकवर तिचा पहिला डान्सिंग व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओला अगदी कमी वेळात जवळपास लाखोंनी व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा डान्सिंगसह अभिनय क्षेत्रातही आपलं नशीब अजमावताना दिसत आहे. आता टिकटॉकच्या निमित्ताने तिच्या डान्सिंग कौशल्याबरोबरच अभिनयाची छोटीशी झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News