लॉकडाऊनमध्ये नोरा फतेही 'या' समस्येने त्रस्त; TikTok व्हिडिओ केला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 May 2020

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज आपल्या सोशल मीडियावर ती आपल्या नव्या पोस्ट शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज आपल्या सोशल मीडियावर ती आपल्या नव्या पोस्ट शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, ती निद्रानाश समस्येने त्रस्त झाली आहे. ती रोज या समस्येशी झगडत आहे. यामुळे ती खूप नाराज आहे.

नोराने हा मजेदार टिकटॉक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, जेव्हा-जेव्हा मी झोपायचा प्रयत्न करते तेव्हा निद्रानाश मला घेरते, परंतु हे असे का होत आहे? माझ्यासारखंच इतरांना देखील ही समस्या होतेय का? नोराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.  हा व्हिडिओ आतापर्यंत १४ लाख वेळा पाहिला गेला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व बॉलिवूड स्टार यांनी काही नुकताच आय फॉर इंडियन थीम घेऊन लॉकडाऊनमध्ये जनजागृती करण्याच्या हेतून व्हिडीओ पोस्ट केले होते. या सर्वाना देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक लहान मोठ्या कामगारांचे नुकसान होत आहे. 

काहींना दोन वेळच जेवण मिळणं देखील कठीण झालं आहे. त्यांच्यासाठी सलमान खान, अमीर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. सलमान खान यांनी बिंग ह्युमन या संस्थेअंतर्गत इंडस्ट्रीतील लहान कामगारांना अन्नपुरवठा आणि पैशांची मदत केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News