२०२१ च्या ऑस्कर यादीत बॉलीवूडच्या 'या' दोन कलाकारांची नामांकने 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 July 2020

जगातील सर्वात मोठा आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्याचे निमंत्रण हिंदीतील सुपरस्टार हृतिक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट यांना पाठविण्यात आले आहे.

मुंबई : जगातील सर्वात मोठा आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्याचे निमंत्रण हिंदीतील सुपरस्टार हृतिक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि निर्माते व दिग्दर्शक यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. पुढील वर्षी 25 एप्रिल रोजी हा सोहळा पार पडणार आहे. त्याला देश-विदेशांतील अनेक कलाकार, तसेच निर्माते व दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.

ऑस्कर अकादमीने 819 जणांची यादी घोषित केली आहे. यामध्ये हृतिक आणि आलिया या दोघांच्या नावाचा समावेश आहे. एकूण निमंत्रितांच्या 819 जणांमध्ये यादीत डॉक्‍यूमेंटरी चित्रपट निर्माती निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, डिझायनर नीता लुल्ला, कास्टिंग डायरेक्‍टर नंदिनी श्रीकांत, व्हिज्युअल इफेक्‍ट सुपरवायझर विशाल आनंद आणि संदीप कमल यांचाही समावेश आहे.

आलिया भट्टचा गली बॉय हा चित्रपटही विदेशी भाषा श्रेणीसाठी भारतामार्फत पाठवण्यात आला होता. मात्र या चित्रपटाला नामांकन मिळाले नाही. आता अकादमीने जारी केलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये आलियाच्या "राजी' आणि "गली बॉय' या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला आहे. हृतिक रोशनच्या सुपर 30 आणि जोधा अकबर याचा उल्लेख केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News