पीएचडीसाठी आता एमफीलची गरज नाही !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

पीएचडीसाठी आता एमफीलची गरज नाही !

पीएचडीसाठी आता एमफीलची गरज नाही !

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तब्बल ३४ वर्षांनंतर नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या आणि सध्याच्या शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल असेल अनेकांचं म्हणणं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील नव्या शिक्षण धोरणाचा अहवाल सादर केला. नव शैक्षणिक धोरण सुसंगत असं तयार करण्यात आलं आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणात भाषेचा पर्याय वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 ते 8 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुरूवातीपासूनच तीन भाषा शिकवल्या जाणार आहेत. तसेच सहावी ते आठवीच्या दरम्यान दोन वर्षांच्या भाषा अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे.  

काल झालेल्या पत्रकार परिषदेत नव्या धोरणाबाबतची माहिती सांगितली, संशोधन करणा-या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाच्या डिग्री प्रोग्रॅमची आयोजन करण्यात आलं आहे. इतर विद्यार्थ्यांना मात्र तीन वर्षे डिग्री प्रोग्रॅम असेल. संशोधन करणाऱ्यांसाठी एक वर्षाच्या एमए सह चार वर्षांची डीग्री झाल्यानंतर पीएचडी करू शकतात. यासाठी आता एमफीलची गरज नसेल. त्यामुळे एमफील आता इतिहासजमा होणार आहे.1968 मध्ये जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं तेव्हापासून तीन भाषांचा फॉर्म्युला कायम आहे. त्यानंतर 1986, 1992 आणि 2005 च्या शैक्षणिक धोरणातही यात बदल करण्यात आला नाही. आता नव्या शिक्षण धोरणातही तीन भाषांचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे.

शालेय स्तरावर शारीरीक शिक्षणाचे महत्व आणखी वाढणार आहे. फिजिक्ल अॅक्टिव्हीटी आणि एक्सरसाइजचा यामध्ये समावेश असेल. याच क्रीडा, योगा, मार्शल आर्ट्स, डान्स यासह स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांनुसार अभ्यासक्रम ठरवले जातील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News