कितीही मोठी धावसंख्या उभारली तरीही ती कमीच- विराट कोहली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 December 2019

मुंबईत जोरदार खेळ करू  दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला, तरी मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आम्ही जोरदार खेळ करू

तिरुअनंतपुरम : अशा प्रकारे झेल सोडले, तर कितीही मोठी धावसंख्या उभारली तरीही ती कमीच ठरेल, असे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या ट्‌वेन्टी-२० सामन्यातील पराभवानंतर व्यक्त केले. 

गेल्या काही वर्षांपासून क्षेत्ररक्षणात कमालीची प्रगती करणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी गेल्या दोन सामन्यांत फारच खालावली. हैदराबादमध्ये विराट कोहलीच्या झंझावाती खेळीमुळे सुटलेल्या झेलांची किंमत मोजावी लागली नव्हती; मात्र दुसऱ्या सामन्यात सुमार क्षेत्ररक्षण मुळावर आले, त्यामुळे १७० धावांचे संरक्षण तर करता आले नाही, परंतु १८.३ षटकांच्या खेळात वेस्ट इंडीजचे केवळ दोनच फलंदाज बाद करता आले होते.

जवळपास सर्वच खेळाडूंकडून चुका होत होत्या. एरवी चपळ क्षेत्ररक्षक समजल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. जो चेंडू सहज अडवता आला असता तेथे त्याने चौकार दिला; मात्र याच वेळी विराटने स्वतः सीमारेषेवर उडी मारत लक्षवेधक झेल पकडून आदर्श निर्माण केला, परंतु आपल्या कर्णधारापासून कोणालाही बोध घेता आला नाही.

आम्ही बऱ्याच चुका केल्या. अखेरच्या चार षटकांत ४० ते ४५ धावा करणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र ३० धावाच करू शकलो, अशी निराशा विराटने व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News