NIT, CFTI प्रवेशासाठी 'ही' महत्त्वपुर्ण अट रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

एनआयटी आणि सीएफटीआयमध्ये प्रवेशासाठी फक्त एका परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि केंद्रीय अर्थसहाय्यीत तंत्रशिक्षण संस्थेत (CFTI) प्रवेश घेण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपुर्ण अट रद्द केली. त्यामुळे एनआयटी आणि सीएफटीआयमध्ये प्रवेशासाठी फक्त एका परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'देशात कोरोना विषाणू्चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. अशा परिस्थितीत आयआयटी (IIT) आणि केंद्रीय अर्थ सहाय्यीत तंत्र शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी बारावीच्या मार्काची अट रद्द करण्यात आली आहे' असे मत केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेख पोखरियाल यांनी ट्विटद्वारे गुरुवारी (ता.23) व्यक्त केले.

 

एनआयटी, सीएफटीआय संस्थेत प्रवेश मिवण्यासाठी फक्त जेईई मेन परीक्षेचे मार्क यंदा ग्राह्य धरले जाणार आहे. बारावीमध्ये फक्त पास होणे आवश्यक आहे. पुर्वी जेईई मेन परीक्षांच्या मार्काबरोबर बारावी परीक्षेत ७५ टक्के मार्क किंवा टॉप २० पर्सेन्टीलची अट होती. ही अट यंदा रद्द करण्यात आली', असे पोखरियाल यांनी सांगितले.

आयआयटी संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा जेईई अॅडव्हान्स आणि बारावी पास असणे गरजेचे आहे असे पोखरियाल यांनी १७ जुलै रोजी सांगितले होते. बारावी परीक्षेतील गुणवत्तेची आट शिथिल करण्यात आली. त्यानंतर बुधवारी NIT, CFTI प्रवेशासाठी बारावीच्या मार्कांची अट रद्द करण्यात आली.    

NIT, CFTI काय आहे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) ही केंद्र सरकराची तंत्रशिक्षण देणारी दर्जेदार संस्था आहे. त्याच बरोबर सेंट्रल फंडींग टेक्निकल इन्स्टिट्यूट (CFTI) म्हणजे केंद्रानी अनुदान दिलेल्या तंत्रशिक्षण सस्था. यांचे नियम, भरती प्रक्रीय, परीक्षा पद्धती जॉइंट अॅडमिशन बोर्ड ठरवत असते. मानव संसाधन विकास मंत्रालायाअंतर्गत या संस्थाचा कार्यभार चालतो.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News