राज्यात नववी, दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालण करुन नववी, दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले. एक दिवस आलटून- पलटून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत.

मुंबई : मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा अखेर जून महिन्यात सुरु झाल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वोतोपरी खबरदारी देऊन गडचिरोली जिह्यातील १७० आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २० शाळा भरवण्यास सुरुवात झाली. शारीरिक अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था, स्वच्छ हात धुणे, सॉनिटायझरचा वापर करणे अशा शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालण करुन नववी, दहावी आणि बारावीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले. एक दिवस आलटून- पलटून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद करण्यात आली. सर्व शाळा, महाविद्यालये नक्की केव्हा सुरु होतील हे सांगने कठीण आहे. कारण दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्यातरी कोणतीही प्रभावशाली लस कोरोनावर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत नाही. मात्र ज्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट उपलब्ध नाही अशा जिह्यात उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची सशर्त परवाणगी देण्यात आली आहे. त्यासोबत काही नियम आणि अटींचे पालण करणे शाळा प्रशासनाला बंधनकारक आहे.

'दुरदर्शन, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडिया, वर्तमानपत्र, रेडीओ सर्वंच प्रसार माध्यमांवर कोरोनाचा विषय चर्चिला जात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे पालकांच्या मनात भिती निर्माण होत आहे. सर्वांत आधी पालकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर करणे महत्त्वाचे होते. शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने मिळून पालकांशी चर्चा केली, वास्तविक परिस्थिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाणार आहे याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पालकांचा विश्वास वाढू लागला. पालकांची इच्छा असेल तर शाळेत पाठवा अशी विनंती केली. तेव्हा पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. ही सर्व प्रक्रीय शाळा सुरु करण्यापुर्वी पंधरा दिवस सुरु केली होती. ग्रामपंचायतीच्या सहयोगाने शाळा निर्जंतूकीकरण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक अंतर पाळण्यासाठी बैठक व्यवस्था निर्माण केली, हात धुण्यासाठी सॉनिटायर ठेवले. एका दिवसाआड वर्ग भरवण्यास सुरुवात केली' अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील नेहरु विद्यायलाचे मुख्याध्यापक विनोद काहुर्के यांनी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News