वालचंद अभियांत्रिकीचा महाविद्यालयाचा उद्या नववा पदवीपूर्ती समारंभ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा पदवीपूर्ती समारंभ शनिवारी (ता. २९) होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ. विलास गायकर, एमटीई सोसायटीचे अध्यक्ष विजय पुसाळकर, खासदार संजय पाटील यांची उपस्थिती आहे. ही माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रियदर्शी सावंत यांनी दिली.

वालचंद महाविद्यालयाला २००६ मध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मिळाली. त्यानंतर महाविद्यालयाने पूर्वीच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करीत सातत्याने प्रगती केली आहे. महाविद्यालयाने सातत्याने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देशात अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे. यंदा चारशे पन्नास पैकी ३९६ विद्यार्थ्यांची विविध उद्योग संस्थांमध्ये निवड झाली आहे. यापैकी २३ विद्यार्थ्यांनी २८ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेचे पॅकेज मिळवले आहे. शिवाय, या वर्षी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. विविध उद्योग संस्थांशी समन्वय करार करीत गुणात्मक दर्जा वाढविला आहे. महाविद्यालयाने स्वतंत्रपणे कालसुसंगत अशी अभ्यासक्रमाची रचना करीत केलेल्या प्रगतीमुळे अनेक उद्योग संस्थांनी संशोधनासाठी सहकार्य केले आहे. महाविद्यालयाच्या या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पदवीपूर्ती समारंभ. टिळक सभागृहात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या समारंभात बीटेक, एमटेक पदवीधरांना पदवी प्रदान केली जाणार आहे. प्रत्येक शाखेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांचा गौरव होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News