निमगिरी किल्याचं हे आहे खास वैशिष्ट्य...

प्रसाद शिंदे
Saturday, 7 September 2019
  • किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्या पासून अंदाजे 200 मीटर वर जंगलात ह्या विरघळी आहेत. आम्ही सर्व डोळे फाडून त्यांच्याकडे पाहत राहिलो.

मुंबई आणि मुंबई बाहेर पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे जिकडे तिकडे हिरवळीची चादर पसरायला आता सुरवात झाली होती. मुंबई बाहेर पावसात ट्रेकिंगला जायला लोकांची आता मोठ्या संख्येने सुरवात झाली होती. हरिहरगड (नाशिक), हरिश्चंद्रगड (नाशिक), पेब फोर्ट (नेरळ), कलावंतीण दुर्ग (पनवेल), लोहगड, विसापूर, कोराई, तिकोना (लोणावळा) इथे जाणाऱ्या लोकांची संख्या तर प्रमाणाच्या बाहेर खूपच वाढत चालली होती.

ह्यात किल्ला आपल्याला नीट चढता आणि उतरता देखील येत नाही. किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीमुळे किल्लादेखील नीट फिरायला मिळत नाही. त्यात वाढणाऱ्या गर्दीमुळे अपघात होण्याचे देखील टेन्शन असतंच. त्यामुळेच थोड लांब अशा किल्ल्यांवर ट्रेकिंगला पावसात जावं जिथे नाही गर्दी असेल नाही कुठला अपघात होण्याचं टेन्शन असेल.ह्यात आपल्यला किल्लादेखील नीट पाहता येतो आणि नाही कसला अपघात होण्याचं टेन्शन राहत. म्हणूनच गडकिल्ले भ्रमंती ग्रुप ने कल्याण मधील जुन्नर परिसरात असलेला दुर्लक्षित असा निमगिरी आणि हनुमंत गड ट्रेक करायचे योजिले.

14 जुलै सकाळी ठीक 7.15 ला सर्व कल्याण स्टेशन वर जमलो आता बस येण्याची वाट बघत बसलो होतो. तब्बल 1 तास लेट बस आली बस वाल्याला बडबडत आम्ही प्रवास चालू केला. बस मधून बाहेरील वातावरण आल्हाददायक वाटत होतं.
धुक्यामध्ये सर्व डोंगररांगा हरवल्या होत्या. पाऊस आणि धुकं ह्याचा एक वेगळाच खेळ बघायला मिळत होता त्यामुळे सर्व गिर्यारोहक खूपच खुश होते. मजलदरमजल करत आम्ही तब्बल साडेतीन तासाने खंडीपाडा गावात पोचलो. उतरल्यावर नजर गेली ती उंचावर असलेल्या निमगिरी आणि हनुमंतगड गडावर.

स्थिरावर झाल्यावर गावातीलच एका घरात दुपारच्या जेवणाची सोय करून आम्ही निमगिरी किल्ल्याकडे कूच करायला सुरुवात केली. गावातील तीन छोट्या बहाद्दर मुलांनी आम्हाला किल्ल्यावर घेऊन जायची तयारी दाखवली. मग काय निघालो निमगिरी किल्ल्याकडे. ट्रेक चालू झाल्यावर पहिल्या टप्प्यात देऊळ लागले देवळात सर्वानी नमस्कार करून फुडची वाट धरली.

निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याला बऱ्याच विरगळी आहेत हे वाचून माहीत होतं म्हणून त्या मुलांना त्या बद्दल विचारले तर चक्क त्यांनी आम्हाला भर जंगलात असलेल्या त्या विरगळी समोरच आणून उभं केलं. किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्या पासून अंदाजे 200 मीटर वर जंगलात ह्या विरघळी आहेत. आम्ही सर्व डोळे फाडून त्यांच्याकडे पाहत राहिलो. इतिहासात ह्या विरघळीना एक अनन्यसाधारण महत्व आहे. जवळजवळ 25 ते 30 सुंदर अश्या त्या पुरातन विरगळी अजूनही इतिहासाची साक्ष देत ह्या जंगलात पडून आहेत.

मनसोक्त आपल्या डोळ्यात त्या विरघळीच्या प्रतिमा साचवून आम्ही फुडचा प्रवास चालू केला. वरून येणारा जोरदार पाऊस आणि वाहवत असणारा जोरदार वारा आमच्या पाउलना अडथळे आणत होता. पण आम्ही देखील नेटाने आमची पाऊलं उचलत होतो. मधेच आलेल्या पायऱ्यांनी मात्र आमचा वेग मंदावला. त्या कातळ कोरीव पायऱ्या बघून मन प्रसन्न झालं मधल्या ठिकाणी 10 ते 12 फुटा पर्यंत पायऱ्या तुटलेल्या होत्या त्यातून वर चढताना बरीच कसरत करावी लागणार होती. आता खरी गरज होती ती तुमच्याकडे असलेल्या गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभवाची. मी संदीप राणे आणि प्रसाद घाटे तिघांनी आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या जोरावर त्या तुटलेल्या पायऱ्यांचा टप्पा सर्वाना घेऊन पार केला.

पाऊस आणि जोरदार सुटलेला वाऱ्याचा मारा सहन करत अखेरी आम्ही किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर पोचलो. दरवाज्याच्या पायऱ्यांवर नमस्कार करून द्यात अज्ञात मावळ्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही किल्ल्यावर प्रवेश केला. किल्ल्यावर आल्यावर सर्वांकडे एक नजर टाकली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकत होता जोरदार वारा आणि पाऊस सहन करत किल्ला सर केलेल्याचे समाधान त्या सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते. थोडा आराम करून फुडें गेल्यावर पाण्याची 2 टाक लागले आणि बाजूला पहिला तर बऱ्याच प्रमाणात चिखल पडला होता आम्हाला लगेच लक्षात आले दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही लोकांनी पाऊस येण्या अगोदर टाक्यांमधील गाळ साफ केला होता.

त्यामुळेच सर्व टाके स्वच्छ पाण्याने भरलेली होती. त्यांचे मनापासून धन्यवाद मानून टाके पाहून फुडें निघालो थोडा चढ चढून वर गेलो आणि समोरच एक चौकोनी अशी तटबंदी सदृश वास्तू दृष्टीस पडली पाहिलं तर त्यामध्ये गजलक्ष्मी शिल्प आणि महादेवाची पिंड होती त्यांना नमस्कार करून आम्ही फुढे निघालो. पुस्तकात असं वाचलं होतं ज्याठिकाणी गजलक्ष्मी शिल्प असते त्या ठिकाणी मुबलक अशी धन धान्य संपत्ती असते. बहुतेक त्या काळात ह्या किल्ल्यावर ती असावी असे वाटते.  अजून थोडं फुढे गेल्यावर अजून एक मोठं पाण्याचं टाक लागलं त्यातील थंडगार पाणी पिऊन सर्वांची क्षुधा शांत झाली.

पाणी पिऊन फुढे निघालो आणि काही अंतरावरच कातळात खोदलेल्या दोन गुंफा दिसल्या त्या नीट पाहून आम्ही परत फिरून किल्ल्यावरून खाली निघायचा प्रवास सुरु केला. आता खरी परीक्षा होती ती त्या पायऱ्यांवरून उतरायची पण न घाबरता आम्ही सर्वाना हळू हळू करून उतरवत तो कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा पार केला आणि जंगलाच्या वाटेला लागलो. सहज पाठी वळून सर्वानी पाहिलं असता बरेच जणांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि तो कातळ कोरीव पायऱ्यांचा टप्पा पार करून आल्याचं समाधान देखील डोळ्यात दिसून आलं.

हळू हळू करत जंगलातून खाली उतरायला सुरुवात केली. अचानक फुढे पाहिलं तर ग्रुप मधील मुलं मुली काही झाडांची पान तोडताना दिसली विचारल असता मला समजलं की ती कडीपत्याची झाड होती आणि तो कडीपत्ता सर्वजण तोडून घेत होते.शेवटी रानमेवा कोणालाही हवाच असतो की आणि तो मुबलक प्रमाणात आहे म्हटल्या वर मजाच मजा. उतरता उतरता सर्वानी बराच कडीपत्ता गोळा केला. सरते शेवटी आम्ही गावात चढउतार झालो. सर्व जणांचे हात कडीपत्ता गोळा करून भरलेले होते. तोंडातून आपसूकच निघून गेले कडीपत्ता गॅंग.

सर्वजण फ्रेश होऊन लगेच जेवायला बसलो सगळ्यांच्या पोटात हत्ती घोडे कावळे सर्वच बोंबलत होते. आणि मावशीनं आणलेल्या सुख चिकन आणि भाकरी वर सर्व तुटून पडले मनात आले जर बकासुर ने आम्हाला असं जेवणावर तुटून पडलेलं पाहिलं असतं तर नक्कीच त्याने आमचे पाय धरले असते. सुख चिकन भाकरी खाऊन झाल्यावर इंद्रायणी भात आणि चिकन रस्सा वाह क्या बात है करत परत भात आणि रस्सा खाण्यात सर्व गुंगून गेले. शाकाहारी लोकांसाठी फक्कड झणझणीत पिठलं आणि भाकर होती त्यांनी देखील त्यावर आडवा हात मारला.

पोटभर जेवण झाल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर रुचकर जेवण जेवल्याचा आनंद झळकत होता. थोडा आराम करून त्या मावशीनं आमची उत्तम अशी जेवणाची सोय करून दिल्याबद्दल आभार मानून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. बस मध्ये बसल्यावर थोड्या वेळातच किल्ला सर केलेल्या श्रमापायी आणि रुचकर अस जेवण जेवून तृप्त झालेल्या मनावर आणि डोळ्यांवर निद्रादेवीने झोपेची चादर पसरली. सर्वजण गाढ झोपून गेले.

साधारण रात्री 9.30 च्या सुमारास आम्ही कल्याण स्टेशन ला पायउतार झालो. आता वेळ होती आपापल्या घराकडे जायची एकमेकांना पुन्हा परत ट्रेक ला भेटण्याची आश्वासन देऊन सर्व ट्रेन पकडायला निघाले. सर्वानी केलेल्या ट्रेक चा आनंद आणि त्याच्या आठवणी मनात साठवून आपल्याला स्टेशन्स ला जाणारी ट्रेन पकडली. अश्याप्रकारे पुन्हा एकदा आम्ही दुर्लक्षित अश्या किल्ल्यापैकी एक निमगिरी किल्ला करून आमचा हा प्रवास संपवला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News