निमगिरी किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • सह्याद्रीची बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे.
  • ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते.
  • या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत.

सह्याद्रीची बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दऱ्याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्र्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्र्चंद्रगड एकच उजवा बाकी सर्व डावेच असे म्हणावे लागेल. हरिश्र्चंद्रगड एकच उजवा बाकी सर्व असे म्हणावे लागेल. हरिश्र्चंद्रगडाच्या एकदाम समोर निमगिरी किल्ला आहे.

पहाण्याची ठिकाणे :-

किल्ल्याच्या पायऱ्या प्रथम उजवीकडच्या डोंगरावर घेऊन जातात. दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी काही टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून किल्ल्याचा फेरफटका मारायला निघायचे. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत.

आतमध्ये एक खोली आहे. यात ५ ते ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. वाटते पुन्हा खराब पाण्याची दोन टाकी लागतात. समोरच एक महादेवाचे मंदिर आहे. यात शिवाच्या डोक्यावर सोंड उगारलेल्या हत्तीचे शिल्प आहे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे आणि वाड्यमांचे अवशेष आहेत. येथून हरिश्र्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर २ पाण्याच्या टाक्र्यांशिवाय आणि गाडल्या गेलेल्या दरवाज्याशिवाय काहीच नाही. संपूर्ण किल्ला एक तासात फिरून होतो.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News