व्यसनमुक्तीसाठी सरकारसोबत एनजीओही घेणार पुढाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेमध्ये दिली माहिती

मुंबई: व्यसनामुळे तरुण पिढीचे आयुष्य खराब होत आहे. व्यसनापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी शासन विविध स्तरावर कार्यवाही करत आहे. मात्र, शासनानेच काम करुन चालणार नाही तर मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीची जनजागृती झाली पाहीजे यासाठी अनेक सामाजिक संस्थाची मदत लागणार आहे असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानपरिषदेमध्ये व्यक्त केले. 

मोठी बातमी वाच : MPSC कार्यालयावर युवकांनी केले अंडे मारो आंदोलन

फक्त मुंबई शहरामध्ये 2019 साली 16 हजार 500 किलो पेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होतो. यावरुन तरुणाई किती व्यसनात बुडाली आहे याचे गाभीर्य लक्षात येते. तरुणाईला व्यसनापासून रोखण्यासाठी सरकार कोणत्या उपाय योजना करत आहे? असा प्रश्न आमदार अनंत गाडगीळ विधानपरीषदेमध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले 'फक्त कायदा करुन चालणार नाही तर समाजतील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीची जनजागृती पाहिजे यासाठी आम्ही स्वयंसेवी सस्थांची मदत घेणार आहेत आणि कार्यशाळा, पथनाट्य, एकांकीका, भारुड अशा विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत असे देशमुख यांनी सांगितले.

हे ही वाचा: घरकाम करणारी तरुणी बनली सर्वोत्कृष्ठ धावपटू; अनेक मॅरोथॉन नावावर 

दरवर्षी व्यसनामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होतो, दिवसेंदिवस तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हयातील महाविद्यालायाचे प्राचार्य आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या सुटना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News