“पुढच्या बारीनं जिकू”

डॉ. स्वप्‍नील मानकर
Thursday, 11 July 2019

पायटी ईचारे बायको

नाराज कावून दिसता

मी मनलं भारत हरला

आता कायले पुसता

पायटी ईचारे बायको

नाराज कावून दिसता

मी मनलं भारत हरला

आता कायले पुसता

मोठ्या आशेनं आम्ही

सर्व मॅच पायल्या होत्या

आमच्या साऱ्या आशा

अधुऱ्या रायल्या होत्या

मजा घ्याले सुट्टी काढुन

नवा टीव्ही घेतला होता

देशभक्तीचा दिवा मनात

लय जोरात चेतला होता

 रोहित, विराट, राहुल

कोनिबी चालले नाही

कार्तिक, पंत चे बल्ले

काहीबी बोलले नाही

जडेजा आणि धोनीनं

उलीसा रंग भरला होता

पण त्यायचा प्रवास बी

जरा अपुरा ठरला होता

हिम्मत ना हारू मनलं

पुढच्या बारीनं जिकू

अजून मेहनत करून

तवा शेवटपावतर टिकूृ

हार जीत होतच रायते

थे काय एक गेम आहे

पण भारत मातेवर मात्र

माय खरंखुरं प्रेम आहे

 पण भारत मातेवर मात्र

मायं खरंखुरं प्रेम आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News