प्रेम करणाऱ्यांसाठी पुढीच 24 तास असतील एकदम खास...

यिनबझ टीम
Tuesday, 4 February 2020

तरुणांसाठी आता काही दिवसातच डे सुरू होतील, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 24 तासांमध्येच प्रेम करणाऱ्यांसाठी खूपच खास असणार आहेत. हिंदू पंचांगाच्या नुसार प्रेम करणाऱ्यांचा मोसम आला आहे. हिंदू पंचागानुसार शुक्र मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे, सोबतच जया एकादशीचे पर्वदेखील सुरू झाले आहे.

नवी दिल्ली :  4 आणि 5 फेब्रुवारी ही तारीख प्रेमविरांसाठी खूपच खास समजली जाते. प्रेम, नाती, विश्वास, सलोखा, आयुष्य अशा गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक प्रेमविरांसाठी हा महिना खूपच खास असतो.

आपण प्रेम व्यक्त करण्यास सक्षम नसाल किंवा आपल्या जोडीदाराशी मनापासून बोलण्यास घाबरत असल्यास काळजी करू नका, या महिन्यात तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनातील अनेक गोष्टी सांगण्याची उर्जा नक्की येईल. हिंदू पंचांगानुसार 3 फेब्रुवारी रोजी गुरू आणि शुक्रने मीन राशीत प्रवेश केला आहे. जे प्रेम करतात त्यांच्यासाठी ही चांगलीच बातमी आहे.

प्रेमी 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची वाट पहात आहेत. परंतु हिंदू पंचांगानुसार तुमचा व्हॅलेंटाईन सुरू झाला आहे.

3 फेब्रुवारी रोजी, शुक्र सकाळी 02:00 वाजता मीन राशीत दाखल झाला आहे. शुक्राच्या संक्रमणाचा कालावधी खूप विशेष आहे, कारण या संक्रमणाला शुभकाम करण्याचा मुहुर्त देखील म्हटले जाते. हे शुक्राचे संक्रमण संपूर्ण 12 राशींवर दिसेल. त्यामुळे सर्व राशीतील प्रेमविरांना याचा फायदा होऊ शकतो.

5 फेब्रुवारी 2020 हा जया एकादशीचा उत्सव (2020) आहे. जे लोक आपल्या जोडीदारावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी ही एकादशी खूप महत्वाची आहे. जया एकादशीला निर्जला उपवास ठेवणाऱ्यांना त्यांचे प्रेम मिळणे सोपे असते, असे पंचांगामध्ये नमुद केले आहे. फक्त प्रेमच नाही तर नात्यात झालेले ब्रेकअप आणि भांडणेदेखील दूर होतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News