न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आयपीएलला नकार घंटा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आयपीएलचा घाट लवकरच घातला जाणार असला तरी अजून वेळापत्रक जाहीर व्हायचे आहे; परंतु त्या अगोदरच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाशी करारबद्ध असलेल्या टेंट्र बोल्डने नकार घंटा वाजवली आहे

मुंबई :- आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आयपीएलचा घाट लवकरच घातला जाणार असला तरी अजून वेळापत्रक जाहीर व्हायचे आहे; परंतु त्या अगोदरच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाशी करारबद्ध असलेल्या टेंट्र बोल्डने नकार घंटा वाजवली आहे. अमिरातीमध्ये होणे अपेक्षित असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आपण साशंक असल्याचे त्याने सांगितले आहे. 

गतमोसमात दिल्ली कॅपिटल संघातून खेळलेल्या बोल्टला यंदा मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपण काही संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे तो म्हणाला. माझ्यासाठी माझ्या क्रिकेटसाठी आणि माझ्यासह कुटुंबाच्याही आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला जाईल. माझ्यासह आणखी ही काही न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलशी करारबद्ध आहेत. त्यांच्याबाबत मी काही सांगू शकत नाही, पण माझा निर्णय पुढील घडामोडींवर अवलंबून असेल, असेही त्याने सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News