नव्या वर्षात ऐतिहासिक आणि बायोपिक हे दोन चित्रपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020

एक ऐतिहासिक, तर दुसरा सत्य घटनेवरचा चित्रपट. अर्थात एक ‘तान्हाजी... द अनसंग वॉरियर्स’ आणि दुसरा आहे ‘छपाक’. या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत आणि दोन्ही चित्रपट मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणार आहेत. यातील विशेष म्हणजे तानाजी... हा चित्रपट २ डी आणि ३ डीमध्ये असणार आहे.

एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तशी काही नवीन राहिलेली नाही. मागील वर्षी ‘मिशन मंगल’ व ‘बाटला हाऊस’ हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले. या वर्षीही असेच ऐतिहासिक, बायोपिक, देशभक्तीपर चित्रपटांबरोबरच काही चित्रपटांचे सिक्वेलही येणार आहेत.

प्रेक्षकांना खुसखुशीत आणि चमचमीत मनोरंजनाची धमाकेदार मिसळ मिळणार आहे. नवीन वर्षाची सुरुवातच दोन बिग बॅनर्स आणि बिग स्टार्स यांच्या चित्रपटांनी होणार आहे. यातील एक ऐतिहासिक, तर दुसरा सत्य घटनेवरचा चित्रपट. अर्थात एक ‘तान्हाजी... द अनसंग वॉरियर्स’ आणि दुसरा आहे ‘छपाक’.

या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत आणि दोन्ही चित्रपट मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणार आहेत. यातील विशेष म्हणजे तानाजी... हा चित्रपट २ डी आणि ३ डीमध्ये असणार आहे. त्याच्या स्पेशल इफेक्‍ट्‌सवर मोठा खर्च झाला. हा चित्रपट थ्रीडीमध्ये पाहण्याची मजा काही औरच असणार आहे.

‘छपाक’ हा मेघना गुलजारचा चित्रपट आहे. दिल्लीमध्ये लक्ष्मी अग्रवाल या तरुणीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. दीपिका पदुकोन मुख्य भूमिकेत आहे. रणवीर सिंगबरोबर नाते जोडल्यावर, दोनाचे चार केल्यानंतर तिचा प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. मागील वर्षी ‘मिशन मंगल’ व ‘बाटला हाऊस’ हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले. या वर्षीही असेच चित्र बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. ऐतिहासिक, बायोपिक, देशभक्तीपर चित्रपटांबरोबरच काही चित्रपटांचे सिक्वेलही येणार आहे. प्रेक्षकांना खुसखुशीत आणि चमचमीत मनोरंजनाची धमाकेदार मिसळ 
मिळणार आहे.

अन्य काही महत्त्वाचे चित्रपट
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये विश्‍व करंडक स्पर्धा जिंकली होती. कपिल देवच्या नेतृत्वाखाली चषक भारतात आणला होता आणि त्याच कपिल देव यांच्यावर ‘८३’ हा चित्रपट येणार आहे. रणवीर सिंग यामध्ये कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे.

रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोण, बोमन इराणी, ताहिर राज भसीन, साकीब सलीम, ॲमी विर्क जिवा, साहिल खट्टर, चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमा घेऊन येत आहेत.

आलिया भट यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ‘शमशेरा’, ‘भूलभुलैय्या २’, ‘भूजः द प्राईड ऑफ इंडिया’, ‘जर्सी’, ‘तुफान’, ‘कुली नं.१’ सारखे चित्रपट ही २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहेत. थोडक्‍यात या वर्षातील मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News