चीनमध्ये पुन्हा नवा व्हायरस; साथ पसरण्याची भीती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

समजा हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे गेला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ज्या लोकांचं काम डुकरांशी निगडीत अशा व्यक्ती अधिक काळजी घेणं गरजेचं आहे असं चीनच्या वैज्ञानिकांशी अहवालात नमूद केलं आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव अवघ्या जगभरात पसरला आहे, कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक अथक प्रयत्न करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबत नसताना दुसरा साथीच्या आजाराने डोकेवरती काढले आहे. त्यातच कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावा अनेक देशांनी केला आहे.

चीनमध्ये पुन्हा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये संशोधकांकडून हा दावा करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. सध्याचा स्वाईन फ्लू हा आजार २००९ पेक्षा भयानक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

सध्याचा स्वाईन फ्लू हा खूप भयानक असून त्याची अनेक व्यक्तींना बाधा होऊ शकते. तसेच कोरोना असलेल्या ठिकाणी हा साथीचा आजार पसरला तर तो नक्कीच गंभीर रूप घेईल असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. 

नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलं आहे. या साथीच्या आजाराचं संशोधन चीनमधील शास्त्रज्ञ करत आहेत. यांच्या तपासणीसाठी चीनमधील १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतल्याचे सांगितले आहे. 

समजा हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे गेला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ज्या लोकांचं काम डुकरांशी निगडीत अशा व्यक्ती अधिक काळजी घेणं गरजेचं आहे असं चीनच्या वैज्ञानिकांशी अहवालात नमूद केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News