मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर कोकणात नवीन विद्यापीठ ? 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 11 January 2020
  • कोकण विभागात असलेल्या जवळपास ८० महाविद्यालयांना याचा बराच मनस्ताप होतो. कित्येकवेळा विद्यार्थ्याना ह्या गोष्टींचा बराच मनस्ताप होतो.
  •  विद्यार्थ्यांना स्वतःच्या कामासाठी मुंबई मध्ये येऊन खेटा माराव्या लागतात.

मुंबई :सध्या सिंधदुर्ग,पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर अवलंबून राहावं लागत.त्यामुळे कोकणातल्या  मुलांना मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या गोष्टीची  अंमलबजावणी करावी लागते.

कोकण विभागात असलेल्या जवळपास ८० महाविद्यालयांना याचा बराच मनस्ताप होतो. कित्येकवेळा विद्यार्थ्याना ह्या गोष्टींचा बराच मनस्ताप होतो. विद्यार्थ्यांना स्वतःच्या कामासाठी मुंबई मध्ये येऊन खेटा माराव्या लागतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी नाहक पायपीट थांबवण्यासाठी  मूळ कोकणातच स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे पुढे सरसावले असून लवकरच हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

या पार्श्वभूमीवर कोकण कृती समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामनात यांची भेट देखील घेतली या सर्व गोष्टींना उदय सामंत यांची अनुकूलता असल्याचे कृती समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळेल अशी अशा करूया. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News