'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला नवे वळण; अमोल कोल्हेंनी उलगडला मालिकेचा शेवट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • मागील अडीच वर्षे चालत असणारी झी मराठीवरील बहुचर्चित 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेला एक वेगळच वळण आलं आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ही मालिका अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचली  आहे.

पुणे: मागील अडीच वर्षे चालत असणारी झी मराठीवरील बहुचर्चित  'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेला एक वेगळच वळण आलं आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ही मालिका अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचली  आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी मालिकेच्या अंतिम टप्प्यात संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग दाखवला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु  खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी याचा उलगडा केला आहे. 

यावेळी ते म्हणाले की, अर्जुन खोतकर यांच्या बोलण्याचा आदर आहे मला. परंतु मालिकेतील सर्व गोष्टींची मुळात योग्य ती काळजी घेतली असल्याने,कुणाच्या सांगण्यावरून बदल करण्याची गरज नाही. असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झालेले असल्याने मालिकेत काय दाखवायचे याचा पूर्णपणे निर्णय 'झी मराठी' वाहिनीचा असणार आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनी यांनी मिळून एका जबाबदारीने या मालिकेची भिस्त उत्तम आणि नैतिकतेने सांभाळली आहे. अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा कोणताही भाग दाखवण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. त्यांनतर संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळण्याचे मी कोणतेही आश्वासन अर्जुन खोतकर यांना दिले नसल्याचे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News