जोडप्यांना मुल निर्माण करुन देणारा नवामंत्र

सुदर्शन चव्हान
Sunday, 9 June 2019

‘हॅंडमेड  म्हणजे गर्भाशयांचा पुरेपूर वापर केला जावा म्हणून या हॅंडमेड्‌सना दरवर्षी एका नवीन जोडप्यासोबत राहायला पाठवतात. ती हॅंडमेड त्यांना एक मूल देईल आणि पुढच्या वर्षी दुसऱ्यांसोबत राहायला जाईल.

कादंबरीच्या कथानकानुसार, मनुष्याची प्रजनन क्षमताच नाहीशी होते. नवं मुल जन्माला येणं अवघड होतं. प्रश्न मनुष्यजातीच्या अस्तित्वावर येतो. यावर उपाय म्हणून अमेरिका धर्माकडे परत जातो. बायबलच्या कराराप्रमाणे स्त्रियांनी कसं राहावं, काय करावं, याबाबत जे काही नियम घालून दिले आहेत, ते पाळले नाहीत म्हणून अशी परिस्थिती उद्‌भवली हा समज पक्का होतो. कित्येक स्त्रिया ज्यांना आई होता आलं नाही, त्याही या सर्वाला पाठिंबा देतात. स्त्रिया तीनच भूमिकांमध्ये दिसू लागतात. कोणाची तरी बायको ‘वाईफ’, घरातली नोकर अर्थात ‘मार्था’, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ‘हॅंडमेड’. त्यांचीच ही कहाणी.
     
भारतीय पुराणातील एका कथेत जगातली पापं खूप वाढलेली असतात. एका जगबुडीमध्ये मनु नावाचा राजा त्यातून काही जणांना वाचवतो. काही दिवसांनी पाणी ओसरतं. मनु परत जमिनीवर येतो आणि त्याला हवं तसं ‘धर्माचं’ राज्य तिथे वसवतो. १९७९मध्ये इराणचा शहा रझा पहलावीला देशातून हाकलून दिलं जातं. त्या जागेवर एक क्‍लर्जी अयातुल्ला खोमेनी देशाचा नेता बनतो. तिथेही ‘धर्माचं’ राज्य येतं. 
     
कथा पौराणिक असो वा सत्य घटना. जगातल्या समस्या वाढल्या की व्यवस्थाच उलटून दिली पाहिजे, अशी एक भावना निर्माण होत असते आणि या समस्या हाताबाहेर गेल्या, की लोकांचा माणसांऐवजी देवा-धर्मावरचा विश्वासही वाढीस लागतो. मार्गारेट ॲटवूड या कॅनेडीयन लेखिकेने माणसाच्या या लक्षणाचा वेध घेत एक कादंबरी लिहिली. जिचं नाव ‘द हॅंडमेड्‌स टेल’. या कादंबरीमध्ये समस्या अशी उभी राहते की, मनुष्याची प्रजनन क्षमताच नाहीशी होते. नवीन मूल जन्माला येणं अवघड होऊन बसतं. या समस्येचे उपाय शोधायला अमेरिका आपल्या धर्माकडे परत जातो. बायबलप्रमाणे स्त्रियांसाठी जे काही नियम घालून दिले आहेत, ते पाळले नाहीत म्हणून आपल्यावर देवाचा कोप ओढवल्याचा समज पक्का होतो. ज्या स्त्रियांना आई होता आलं नाही, त्याही याला पाठिंबा देतात. स्त्रिया तीनच भूमिकांमध्ये दिसू लागतात. कोणाची तरी बायको ‘वाईफ’, घरातली नोकर अर्थात ‘मार्था’, तिसरी म्हणजे ‘हॅंडमेड’. या हॅंडमेड म्हणजे जगातील प्रजनन क्षमता अजूनही राखून असलेल्या ५ ते १० टक्के स्त्रिया आहेत. 
   
या गर्भाशयांचा पुरेपूर वापर केला जावा म्हणून या हॅंडमेड्‌सना दरवर्षी एका नवीन जोडप्यासोबत राहायला पाठवतात. ती हॅंडमेड त्यांना एक मूल देईल आणि पुढच्या वर्षी दुसऱ्यांसोबत राहायला जाईल. ही सर्व जोडपी अर्थातच श्रीमंत असतात. ही सर्व कादंबरी आपल्याला सांगितली जाते, ती एका हॅंडमेडच्या मर्यादित दृष्टिकोनातून. एका पुस्तक प्रकाशकाकडे संपादक म्हणून काम करणारी एक स्त्री आता फक्त एक गर्भाशय बनून राहते. तिची ही कथा. म्हणूनच कादंबरीचं नाव आहे ‘द हॅंडमेड्‌स टेल’. २०१७ मध्ये ‘हुलू’ या ऑनलाईन प्लटफॉर्मने कादंबरीवर मालिका केली. पहिल्याच वर्षी या मालिकेने ‘एमी पुरस्कार’ जिंकला. जगभरात उजव्या विचारसरणीची सरकारं येत असताना ही मालिका महत्त्वाची होऊन जाते. भविष्यात जात ती आपल्या वर्तमानाला आरसा दाखवते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News