जाणून घ्या, यंदाच्या आयपीएलमधील नवीन नियम...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 January 2020

यंदाचे आयपीएल सामने खास पद्धतीने रंगणार आहेत कारण, यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या नियमांची भर करण्यात आली आहे.

मुंबई : 'त्योहार भारत का' म्हणून ओळख असलेल्या आयपीएलचा यंदाचा १३ वा हंगाम असणार आहे. या वर्षीचे आयपीएल सामने २९ मार्च पासून ते २४ या कालावधीत होणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचे आयपीएल सामने खास पद्धतीने रंगणार आहेत कारण, यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या नियमांची भर करण्यात आली आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

नियम

  • नवीन नियमानुसार 'नो बॉलचा' निर्णय मैदानावरच्या पंचाच्या ऐवजी तिसरा पंच घेईल. म्हणजे नो बॉलचा निर्णय थर्ड अंपायर देऊ शकेल. या नियमाची चाचणी भारत आणि वेस्ट इंडिज एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत घेण्यात आली होती. 
  • दुसऱ्या नियमानुसार जर सामना चालू असताना खेळाडूला दुखापत झाली तर त्याच्या बदल्यात आता नवीन खेळाडूला संधी मिळू शकते. 

याचबरोबर आजून एक नियम बैठकीत आजून एक निर्णय मांडण्यात आला होता की, खेळवले जाणारे सर्व सामने रात्री ८ च्या ऐवजी ७.३० ला खेळवण्यात यावे. मात्र हा प्रस्ताव बैठकीतीत फेटाळण्यात आला. यामुळे सर्व सामान्यांची सुरवात ८ वाजताच होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News