राज्यमंत्री आदिती तटकरेंकडे नवी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

विधी व न्याय विभागाचा कार्यभार सांभाळण्याची नवी जबाबदारी आमदार आदिती तटकरेंकडे असणार आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात सर्वांत तरुण आमदार म्हणून आदिती तटकरे हिच्याकडे पाहिले जाते. आमदार तटकरेंना आनखी एका नव्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाचा कार्यभार सांभाळण्याची नवी जबाबदारी आमदार आदिती आदीतीरेंकडे असणार आहे.

पुर्वी राज्यमंत्रीपद आदिती कटकरेंकडे क्रिडी व युवक कल्याण, भूविज्ञान आणि खनकर्म, उद्योद, फलोत्पादन, पर्यटन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राजशिष्टाचार सात विभागाची जबाबादारी होती आता विधि व न्याय विभागाचा कार्यभार दिल्यामुळे एकुण आठ विभाग तटकरेंना सांभाळावे लागणार आहेत. एका मंत्र्यांवर आठ विभाग जबाबदारी देणे खुप मोठी गोष्ठ आहे. आठ विभागांचा कार्यभार सांभाळण्यासाठी तटकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेक नवतरुण चेहरे उत्सूक होतो. मात्र आमदार आदिती तटकरे यांची वर्णी मंत्रीमंडळात लागल्यामुळे अनेक जेष्ठ आमदारांचा भ्रमनिराश झाला होता. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी आपली नाराजी प्रसार मध्यमांना बोलून दाखवली होती तर काही लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी धूमकुळ घातला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News