केंद्र सरकारकडून दुचाकीसाठी जारी केली नवी नियमावली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

केंद्र सरकारकडून दुचाकीसाठी जारी केली नवी नियमावली

केंद्र सरकारकडून दुचाकीसाठी जारी केली नवी नियमावली

महाराष्ट्र - अनेकांना दुचाकी चालवता येते, परंतु त्यांच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नसतो. तसेच काहीजण असेही असतात, की ज्यांच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना असतो. पण त्याला सरकारची नियमावली माहित नसते. अशी असंख्य उदाहरणं आपण नेहमी पाहत असतो. नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुशंगाने केंद्र सरकारकडून नेहमी नवी नियमावली आखली जाते. विशेष म्हणजे सद्या जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत दुचाकीवर पाठीमागे एक व्यक्ती सामान ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून नेहमी अपघात टाळण्यासाठी अनेक नवे प्रयोग केले जात असतात. त्या धर्तीवर केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीत दुचाकीवर मागे बसणा-या व्यक्तीसाठी सीटखाली हॅण्ड होल्डर असणं गरजेचं आहे. जेणेकरून अपघात समयी मागच्या व्यक्तीला हॅण्ड होल्डरला पकडता आलं पाहिजे.

अजूनतरी अशी कोणतीही सुविधा दुचाकी मध्ये आलेली नाही. तसंच मागे बसणा-या व्यक्तीसाठी फुटरेस्ट असणं गरजेचं आहे. नव्या नियमावलीच्या अनुशंगाने एखादी व्यक्ती जर पाठीमागे बसली. समजी ती व्यक्ती महिला असली तर ओढणी किंवा साडीचा पदर चाकात जावू नये यासाठी चाकाजवळील ग्रीलला प्लास्टिकचे कव्हर लावावे.

परिवहन विभागाने छोटे कंटेनर ठेवण्यासाठी निर्देश दिले आहेत. कंटेनरची लांबी ही ५५० मिमी, रूंदी ५१० मिमी आणि उंची ५०० मिमीपेक्षा मोठी असता कामा नये.  हे कंटेनर लावले असले तरचं दुचाकी चालवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हे नसल्यास अन्य व्यक्तीला पाठीमागे बसून प्रवास करण्यास मनाई असेल.

तसेच नव्या नियमावलीत दुचाकीच्या टायराबाबतही सुचवण्यात आले आहे. एखाद्या बाईकचे वचन ३.५ टन असल्यास त्या बाईकला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम लावण्यात यावी. ते लावल्यानंतर टायरात किती हवा आहे. टायराची परिस्थिती काय आहे याची माहिती मिळेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News