जम्पसूटचा रुजतोय नवा ट्रेण्ड... 

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 19 June 2019
  • जम्पसूटच्या फॅशनची क्रेझ तरुणीपासून चाळीशीतील महिलांपर्यंत लोकप्रिय ठरत आहे
  • एकाच कपड्यात तयार केलेले हेजम्पसूट म्हणजे टॉप आणि पॅंट यांचं कॉम्बिनेशन आहे.
  • कमरेला असणाऱ्या इलॅस्टिकमुळे टॉप आणि पॅंट वापण्यास आरामदायी असते.

सोलापूर : सुटसुटीत कपडे घालण्याकडे तरुण-तरुणाईचा कल वाढत आहे. जम्पसूटच्या फॅशनची क्रेझ तरुणीपासून चाळीशीतील महिलांपर्यंत लोकप्रिय ठरत आहे. एकाच कपड्यात तयार केलेले हे जम्पसूट म्हणजे टॉप आणि पॅंट यांचं कॉम्बिनेशन आहे. एकच रंग आणि एकच प्रिंट असल्याने वेगळाच आनंद मिळतो. कमरेला असणाऱ्या इलॅस्टिकमुळे टॉप आणि पॅंट वापण्यास आरामदायी असते. नायलॉन, कॉटन, लायक्रासारख्या कापडांपासून बनवलेले हे जम्पसूट आता बाजारात वेगळीच ओळख निर्माण करत असल्याचे चित्र पाहण्यात येते. 

तरुणाईसह महिलांना पाहिजे त्या प्रकारच्या हाफ, थ्री फोर्थ अथवा फुल साइजमध्ये नवीपेठेतील दुकानांत जम्पसूट उपलब्ध आहेत. 500 ते दोन हजार रुपयांपर्यंत किमती असून दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. अनेकजण वेगळ्या प्रकारचे पोशाख घालतात, जेणेकरून आपण इतरांपेक्षा आकर्षक दिसावे, असा त्यामागचा उद्देश असतो. कपड्यांवरून माणसाच्या परिस्थितीचा काहीजण अंदाज लावतात. त्यामुळे नव्या फॅशनकडे तरुणाईचा कल वाढत असल्याचे चित्र बाजारात पाहण्यात येते. फॅशनच्या दुनियेत दरवर्षी शेकडो स्टाइलिश ट्रेंड बाजारात येतात. मात्र, काही ट्रेंड वर्षानुवर्षे तसेच असतात. डेनिमच्या कपड्याचा ट्रेंड सेलिब्रिटींमध्ये ऑल टाइम फेवरेट आहे. डेनिम जीन्स, डेनिम जॅकेट, डेनीम वन पीस आणि आता जम्पसूट. हा ट्रेंड बघता बघता खूपच लोकप्रिय झाला असून तीन-चार वर्षांनंतर आता पुन्हा लोकप्रिय झाल्याचे चित्र दिसते. 

"जम्पसूटचे कपडे सुटसुटीत असून त्यामुळे खूप छान वाटते. जम्पसूटच्या फॅशनमुळे तरुणी आकर्षक दिसायला लागली. पुणे, मुंबईतील फॅशन सोलापुरातही चालते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे."
- दर्शना अडकी 

" नव्या तरुणाईला काय पाहिजे त्यानुसार फॅशन बदलत असते. जम्पसूट घालायला खूप आवडते. जम्पसूट वापरण्यास सुटसुटीत आणि हलके असतो. महाविद्यालयीन तरुणींत ही फॅशन वाढली असून दुकानांत खरेदीस गेल्यानंतर गर्दी पाहण्यात येते." 
-रेवती चाकोते
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News