कौशल्य शिक्षणाचे नवे पर्याय; मिळवून देतील हमखास रोजगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020

बदलत्या काळाचा आढावा घेऊन जगभर मागणी असणारे ट्रेंड विद्यार्थ्यांनी निवडले पाहिजे, त्यामुळे संपुर्ण देशात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. हमखास रोजगार मिळवून देणारे कौशल्याचे नवे पर्याय आम्ही सांगणार आहेत.

मुंबई : कौशल्य प्रशिक्षण म्हटलं की, काही विशिष्ट विभाग डोळ्यासमोर तरंगतात. सिव्हिल, मेकॉनिकल, अॅटोमोबाईल्स, आयटी इत्यादी लोकप्रिय विभागातील ट्रेंड शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र आधुनिक काळात जग बेगाने बदलत आहे. बदलत्या काळाचा आढावा घेऊन जगभर मागणी असणारे ट्रेंड विद्यार्थ्यांनी निवडले पाहिजे, त्यामुळे संपुर्ण देशात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. हमखास रोजगार मिळवून देणारे कौशल्याचे नवे पर्याय आम्ही सांगणार आहेत. हे कौशल्य प्रशिक्षण 3 ते 4 वर्षे कालावधीचे पदवी कोर्सेस आहेत.

कोर्सचे नाव :

  • वोकेशनल एज्युकेशन ऑफ ऑप्टोमेटरी

शैक्षणिक पात्रता:

  • 12 पास किंवा ऑप्थल्मिक टेक्नॉलॉजी पदविका कोर्स उत्तीर्ण

प्रशिक्षण कालावधी:

  • तिन वर्ष शिक्षण, एक वर्षे ऑन फिल्ड इंटर्नशिप

​कोढे मिळणार रोजगाराची संधी?:  

  • विद्यार्थ्यांना ऑप्टोमेट्रीस्ट, कॉन्टॅक्ट लेन्स प्रॅक्टिशनर्स, रेफ्रकॅशनिस्ट क्षेत्रात रोजगार मिळणार

कोर्सचे नाव : वोकेशनल एज्युकेशन ऑफ फूड टेक्नॉलॉजी

शैक्षणिक पात्रता: 12 पास किंवा फूड टेक्नॉलॉजी पदविका कोर्स उत्तीर्ण

प्रशिक्षण कालावधी: 3 वर्षे

कोढे मिळणार रोजगाराची संधी?: 

शासकीय, बिगर शासकीय दोन्ही क्षेत्रात नोकरी मिळणार आहे, त्याचबरोबर प्रॉडक्शन सुपरवायझर, मायक्रोबियॉलॉजिस्ट, फूड इन्स्पेकटर म्हणून रोजगाराची संधी मिळणार आहे.

कोर्सचे नाव:  वोकेशनल एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस

शैक्षणिक पात्रता: 12 पास किंवा इलेक्ट्रॉनिक्स पदविका कोर्स उत्तीर्ण

प्रशिक्षण कालावधी: 3 वर्षे 

कोढे मिळणार रोजगाराची संधी?:

  • विद्यार्थ्यांना शासकीय/ खासजी कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. टेक्निशिअन्स, सुपरव्हायझर्स, टेक्निकल असिस्टंट्स, हार्डवेअर टेक्निशिअन्स म्हणून रोजगार उपलब्ध होणार आहे.

कोर्सचे नाव:  वोकेशनल एज्युकेशन इन फॅशन डिझायनिंग

शैक्षणिक पात्रता: 12 पास किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये पदविका कोर्स उत्तीर्ण

प्रशिक्षण कालावधी: 3 वर्षे 

कोढे मिळणार रोजगाराची संधी?: 

  • हा कोर्स चंदेरी दुनियाचं दार उघडणारा आहे.  फॅशन डिझायनिंग, आवॉर्ड, डिझाइन कन्सल्टंट्स, फॅशन स्टायलिस्ट्स क्षेत्रात रोजगाराची संधी मिळणार आहे.

कोर्सचे नाव :  वोकेशनल एज्युकेशन इन ग्राफिक्स अँड मल्टीमीडिया

शैक्षणिक पात्रता: 10 वी पास

प्रशिक्षण कालावधी: 3 वर्षे 

कोढे मिळणार रोजगाराची संधी?: 

  • इलेक्टॉनिक आणि प्रिंट मीडिया, चित्रपट, टि. व्ही, प्रॉडक्शन मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, सेल्स अँड मार्केटिंग क्षेत्रात रोजगाराची संधी मिळणार आहे.

कौशल्य प्रशिक्षण संस्था:

सेंटर फॉर वोकॅशन अँड टेक्निकल एज्युकेशन,
प्रेमलीला विठ्ठलदास पॉलीटेक्नीक, एसएनडीटी विद्यापीठ, जुहू कॅम्पस
संपर्क-  ७७७७०११३३१, ७७७७०११३३१५, ७७७७०११३३१६

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News