गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांचा नवा चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि अभिनेते सयाजी शिंदे एका चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे.

दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या संस्थेकडून करण्यात आली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन प्रसाद नामजोशी यांनी केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News