आता घर बसल्या मिळवा १० हजार रुपये प्रति महिना; पाहा काय आहे योजना 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास सुरुवातीला गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एकत्र पैसे गुंतविल्यावर अधिक लाभ मिळतो.

नवी दिल्ली : ठराविक कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला जर १० हजार मिळणार असतील तर खूपच फायदेशीर ठरते. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान वय वंदन योजना सुरु करण्यात आली आहे. नोकरीमध्ये मिळणारी पेन्शन आता बंद करण्यात आल्याने नोकरीनंतर उत्पन्नांचे किंवा मिळकतीचे साधन पूर्णपणे बंद होते. मात्र या योजनेमुळे ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना फायदा होणार आहे. कारण ही पेन्शन योजना आहे. 

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास सुरुवातीला गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एकत्र पैसे गुंतविल्यावर अधिक लाभ मिळतो. ३१ मार्च २०२० पर्यंत या योजनेसाठी गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेअंतर्गत विविध पर्याय देण्यात आले आहेत. वरिष्ठ नागिरकांनी यामध्ये मासिक पेन्शनचा पर्याय निवडला तर त्यांना १० वर्षांसाठी ८ टक्क्यांनी रिटर्न मिळणार आहे. दरम्यान या योजनेला जीएसटी पासून सुटका देण्यात आल्याने अधिक फायदा मिळणार आहे. 

या योजनेत जास्तीत जास्त म्हणजे १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येईल. १५ लाखांवर दार महिन्याला १० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असणार आहे. ही पेन्शन दार महिन्याला किंवा वार्षिक काढता येणार आहे. दार महिन्याला काढल्यास ८ टक्के व्याज मिळणार आहे, तर वार्षिक पेन्शन काढल्यास ८. ३ टक्के व्याज मिळणार आहे. 

या योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. त्यामध्ये पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, चेकची किंवा बँकेच्या पासबुकची कॉपी, यांचा समावेश आहे. ही योजना घेण्यासाठी बँकेत किंवा एलआयसी एजेंटशी संपर्क करता येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News