महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील नवीन पिढी, आता आदित्य विरुद्ध अमित ठाकरे

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 23 January 2020
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नविन झेंड्याचे अनावरण केले.
  • झेंड्याचा रंग बदलून भगवा केला आहेच याशिवाय, राज ठाकरे यांनी आणखी एक मोठा बदल केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नविन झेंड्याचे अनावरण केले. झेंड्याचा रंग बदलून भगवा केला आहेच याशिवाय, राज ठाकरे यांनी आणखी एक मोठा बदल केला आहे. राज यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांना राजकारणात आणले आहे. अमित ठाकरे आता वडिलांच्या पक्षात मनसेत दाखल झाले आहेत.  

त्यांचे चुलतभाऊ उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि पुतण्या आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत अशा वेळी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य हे दोघेही सध्या राज्यात सत्तेत आहेत.  

दुसरीकडे, राज ठाकरे राजकीयदृष्ट्या रस्त्यावर उतरले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष मनसेही संकोचित दिसत होता आणि त्यातील फक्त एक जागा जिंकून आली. तसेच, एक काळ असा होता की राज ठाकरे हे बाळासाहेबांचे वास्तविक राजकीय वारस म्हणून पाहिले जात होते.

राज ठाकरे यांना बाळासाहेबांचा वारसा मिळाला नाही

बाळासाहेबांचे 17 नोव्हेंबर 2012 मध्ये निधन झाले. आपल्या हयातीत बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढविली नाही, परंतु शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या सत्तेत मोठा हस्तक्षेप केला. याशिवाय, बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आक्रमक वृत्तीने वेगळ्या राजकारण्याची प्रतिमा देखील तयार केली, ज्यांची वारंवार टीका देखील केली जात होती. पुतण्या राज ठाकरे नेहमीच बाळसाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी अस्मिताला पुढे ठेवून उत्तर भारतीयांना लक्ष्य करत राहिले.

हे सर्व असूनही बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेच्या आदेशासह बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा उद्धव ठाकरे यांच्या हाती गेला आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कमकुवत झाले. बाळसाहेब ठाकरे यांच्या निधनापूर्वीच राज ठाकरे यांनी मनसे अस्तित्त्वात आली असली तरी त्यांचे राजकीय कवच उदयास कधीच येऊ शकले नाही.

आता पुतण्यासमोर मुलगा

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष बराच काळ सुरू आहे आणि या लढाईत उद्धव ठाकरे यांचेच पारडे नेहमी वरचढ ठरले आहे. आता दोन्ही भावांची पुढची पिढी राजकारणात दाखल झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही कौटुंबिक परंपरेविरोधात निवडणूक लढविली आहे आणि वडिलांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदही सांभाळत आहेत. तर राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे नुकताच राजकारणात दाखल झाला आहे.   

अशा परिस्थितीत उद्धव-राज यांच्या राजकीय लढाईत ठाकरे कुटुंबातील दोन वारस असलेले आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यात लढा कसा होईल, हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News