फाल्गुनी पाठकचा नवा गरबा सॉंग आला समोर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 September 2019
  • गरबा क्विन फाल्गुनी पाठकचा नवा गरबा सॉंग व्हायरल 

मुंबई : ‘ओढणी ओढू तो’, ‘गरबा रमवा आवजो’ यासारख्या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला लावणारी फाल्गुनी पाठक. तिची ‘ओ पिया’, ‘पल पल तेरी याद’ या सारखी अनेक गाणी गाजली. आता लवकरच फाल्गुनी पाठक एका नवीन गाण्यासह प्रेक्षकांसमोर आली आहे. तिने अस्सल गरबा रासचे सार जपण्यासाठी ‘राधा ने श्‍याम’ हे गाणे गायले आहे.

फाल्गुनीसोबत संगीतकार शैल हाडा यांनीही या गाण्याला आवाज दिला असून अशोक भोज यांनी हे गाणं लिहिले आहे. याबद्दल फाल्गुनी म्हणते, हे गाणे म्हणजे संस्कृती आणि कलेचे उत्तम उदाहरण आहे आणि मी या गाण्याचा भाग असल्याने मला अतिशय आनंद होत आहे. फाल्गुनीचे हे नवे गाणेदेखील लोकप्रिय ठरणार यात शंका नाही.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News