ट्विटरवर नवीन फिचर लॅंच; मर्यादीत व्यक्तींनाचं रिप्लाय देता येणार, जाणून घ्या कस वापराव फिचर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020

पुर्वी एक ट्विट केल्यानंतर त्यावर अनेकांना रिप्लाय देता येत होता मात्र या नवीन फिचरमुळे फक्त काही मर्यादित व्यक्तींना रिप्लाय करता येणार आहे.

देशातील सर्वात विश्वसनीय माध्यम म्हणून ट्विटरकडे पाहिले जाते. ट्विटरवर सर्वाधिक युजर सक्रीय राहतात, त्यामुळे अनेकदा एखाद्या विषयावर युजरला विनाकारण रिप्लाय करुन ट्रोल केले जाते. यावर ट्विटरने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. यामुळे ट्रोल होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. पुर्वी एक ट्विट केल्यानंतर त्यावर अनेकांना रिप्लाय देता येत होता मात्र या नवीन फिचरमुळे फक्त काही मर्यादित व्यक्तींना रिप्लाय करता येणार आहे. या नवीन फिचरची टेस्टिंग कंपनीने मे महिन्यात सुरू केली होती. ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे आणि हे नवीन फिचर कंपनीने लॅंच केले. काही दिवसात हे फिचर भरातात सुरु केले जाऊ शकते. त्यामुळे युसर्जना नियंत्रीत करण्यासाठी उपयोगी येणार आहे. 

ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक यांनी एक माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, ज्या युजर्सना मर्यादीत फिचरचा पर्याय देण्यात आला होता त्यांनी ट्विट करताना समाधान व्यक्त केले, त्यामुळे हे नवीन फिचर लॅंच केले, युजर्सना नक्की आवडेल.

नवीन फिचर कसे करणार काम? 

ट्विटरच्या कंपोज बॉक्समध्ये लिहतांना who can reply नावाचा पर्याय समोर येईल, त्याला सलेक्ट केल्यानंतर Everyone, People you follow आणि Only People You mention असे तिन पर्याय दिसतील.

  • त्यातला पहिला पर्याय Everyone सिलेक्ट केल्यानंतर सर्व युजर्सना ट्विटवर रिप्लाय करता येईल. देशातील सर्व ट्विटर युजर्सना उत्तर देण्याची सोय उपलब्ध होणार आहे. 
  • दुसरा पर्याय you follow स्वत:चे फॉलोअर्स तुमच्या ट्विटला रिप्लाय करु शकतील. या व्यतिरिक्त कोणालाही रिप्लाय करता येणार नाही.
  • तिसरा पर्याय Only People You mention ओन्ली पिपल्स यु मेन्टेंन सिलेक्ट केल्यानंतर ट्विटमध्ये टॅग केलेल्या लोकांनाच रिप्लाय करतात येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News