बंदी केलेल्या चायनीज अॅपची नव्याने भारतात एन्ट्री, कोट्यवधींनी केले डाउनलोड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020
  • काही दिवसापूर्वी सुरक्षेच्या कारणामुळे केंद्र सरकारने काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
  • पण आता हे अ‍ॅप्स नवनव्या मार्गांनी भारतीय युझर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई :- काही दिवसापूर्वी सुरक्षेच्या कारणामुळे केंद्र सरकारने काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण आता हे अ‍ॅप्स नवनव्या मार्गांनी भारतीय युझर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅप स्टोअरवर चिनी अ‍ॅप्सची संख्याही वाढताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार त्यात चिनी अ‍ॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जनही आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सुरूवातीला केंद्र सरकारने टिकटॉकसहित ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ४७ आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ११८ अ‍ॅप्स बॅन करण्यात आली होती.

रिपोर्टमध्ये काही अशा अ‍ॅप्सबद्दलही सांगण्यात आले आहे जी नावे बदलून पुन्हा भारतात आली आहेत. उदाहरण पाहायचे झाल्यास स्नॅक व्हिडीओ हे अ‍ॅप टेन्सेंटच्या kuaishou या चिनी कंपनीने तयार केले आहे. विशेष बाब ही की अ‍ॅप एकमद Kwai या अ‍ॅपप्रणाणे दिसते. हे अ‍ॅप सरकारने बॅन केले होते. स्नॅक व्हिडीओला गुगल प्ले स्टोअरवर १० कोटींपेक्षा अधिक डाउनलोड्स मिळाले आहे. इतकंच नाही तर या अ‍ॅपमध्ये टिकटॉकसारखेही फिचर्स देण्यात आले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

दुसऱ्या अ‍ॅपबद्दल सांगायचे झाल्यास भारतात Hago हे अ‍ॅप बॅन करण्यात आलं. याद्वारे अनोळखी लोकांसोबत चॅट रूम तयार करणे आणि गेम्स खेळण्याची सुविधा मिळत होती. आता त्या अ‍ॅपची जागा Ola Party नावाच्या एका अॅपने घेतली आहे. या अ‍ॅपमध्ये गेम खेळण्याची सुविधा मिळत नसली तरी Hego अ‍ॅप युझर्सच्या प्रोफाईल, फ्रेन्ड्स आणि चॅट रूम्स यात इंपोर्ट करण्यात आल्या आहे. त्या युझर्सना थेट Ola Party या अ‍ॅपवर साईन इन करता येणार आहे.

सरकार काय उचलणार पाऊल?

नव्या रूपात आलेल्या चिनी अ‍ॅप्सबद्दल प्रश्न विचारल्यानंतर यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. “जर असे काही होत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कठोर पावले उचलू. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणते ही बॅन करण्यात आलेले चिनी अ‍ॅप नव्या रूपात उपलब्ध होऊ दिले जाणार नाही,” असे ही त्यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News