नवीन शैक्षणिक धोरण: पदवीचा कालावधी वाढला, प्रवेशासाठी 'हा' नियम लागू होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे प्रवेश नॅशनल टेस्टींग एजन्सीजद्वारे होणार आहेत. 

नवी दिल्ली:  नवीन शैक्षणिक धोरणात पदवीचा कालावधी एका वर्षानी वाढवण्यात आला आहे. तीन वर्षाची पदवी आता चार वर्षात मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना तीन वर्षात पदवी दिली जाईल. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास एम. फिल करण्याची गरज नाही. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे प्रवेश नॅशनल टेस्टींग एजन्सीजद्वारे होणार आहेत. 

प्रत्येक कोर्स फी निश्चित होणार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक कोर्सेसची फी निश्चित केली जाणार आहे. पुर्वी एकाच कोर्सला देशातील विविध शिक्षण संस्थेत वेगवेगळी फी आकारली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे परवडत नव्हते. खासगी शिक्षण संस्था मनमानी कारभार करून विद्यार्थ्यांकडून अवाढव्य फी घ्यायच्या, अशा अनेक तक्रारींची नोंद सरकारकडे होती. त्यामुळे कोणत्या कोर्सला किती फी आकारली जावी याबाबत महाविद्यालयांना मानांकन दिले जाणार आहे. त्यानुसार फी निश्चित करण्याची योजना आखली जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन दोन्ही शिक्षणाची फी खासगी शिक्षण संस्था आणि सरकार यांच्या चर्चा करुन ठरवली जाणार आहे. २०३० पर्यंत देशातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास झाला पाहीजे. त्याचबरोबर शाळेमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त झाले पाहीजे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळेल, यासाठी सरकार कटीबद्ध आहे.       

परदेशी विद्यापीठांना भारताचे दरवाजे खुले

नवीन शैक्षणिक धोरणात परदेशी विद्यापीठांना भारताचे दरवाजे खुले करण्यात आले. जगभरातील प्रतिष्ठीत विद्यापीठांना भारतात कॉलेज सुरु करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे विदेशात शिक्षणासाठी जाणारे भारतीय विद्यार्थ्यांचे लोंढे थांबवता येणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशाची वाट धरतात. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परीणाम होतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News