नवीन शैक्षणिक धोरण: 3 वेळा बोर्ड परीक्षा, मल्टीपल इन्ट्री, एक्झिट सिस्टम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

नवीन शिक्षण धोरणात मल्टीपल इंट्री आणि एक्झिट सिस्टम दोन पर्याय दिले जाणार आहेत.

नवी दिल्ली : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कारणामुळे विद्यार्थ्यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडले तर शिक्षणाचा कोणताही लाभ विद्यार्थ्यांना पुर्वी मिळत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरणात मल्टीपल इंट्री आणि एक्झिट सिस्टम दोन पर्याय दिले जाणार आहेत. पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र कोर्स आणि दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडणाऱ्यांना पदवीका प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे पदवीला नापास होण्याचा शिक्का कायमचा पूसला जाणार आहे. 

राष्ट्रीय उत्पन्नाचा ६ टक्के भाग शिक्षणावर खर्च होणार

मोदी सरकारने शिक्षण व्यवस्ठा सुधारण्यासाठी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्राच्या एकुण उत्पन्नापैकी ६ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारण्यात मोठी मदत होणार आहे. पु्र्वी एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४. ४३ टक्के खर्च शिक्षणावर केला जात होता. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांनी सरकावर नाराजी व्यक्त केली होती. आणि जीडीपीचा मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च केला जावा अशी मागणी सरकारकडे केली होती. 

तीन वेळा बोर्ड परीक्षा

बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले पाहीजे यासाठी आई- वडील विद्यार्थ्यांवर प्रेशर देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांवर बोर्ड परीक्षेचा मानसिक ताण पडतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी बोर्ड परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ पर्याय आणि वर्णनात्मक अशा दोन स्वरुपात प्रश्न पत्रिका असणार आहे. प्रश्न पत्रिका सोडवल्यानंतर त्यांचे मुल्यांकन बोर्डाकडून होणार आहे. निकालात कौशल्य विकासाचे मार्क समाविष्ठ केले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा मानसिक ताण कमी होईल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News