महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय : नापास शेरा होतोय हद्द्पार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 December 2019

बारावीच्या  परीक्षेच्या मार्कशीटवरून नापास शेरा हटवला जाणारा असून त्याबदल्यात मार्कशीटवर कौशल्य विकासास पात्र असा शेरा दिला जाणार आहे.

दहावीनंतर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारावीच्या  hsc परीक्षेच्या मार्कशीटवरून नापास शेरा हटवला जाणारा असून त्याबदल्यात मार्कशीटवर कौशल्य विकासास पात्र असा शेरा दिला जाणार आहे. आगोदर हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित होता पण आता बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी सुद्धा याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे.

दहावीची व बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरते. या वळणावर परीक्षेमधील निकालाच्या नापास शेऱ्यामुळे भविष्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात, नापास शेऱ्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वासाला तडा जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असून त्याचबरोबर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'कौशल्य सेतू कार्यक्रम' योजना राबविली जाणार आहे. असे शासन निर्णयात मांडले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होऊन स्वयं रोजगाराची संधी त्यांना मिळू शकेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News