मुंबई विद्यापीठाचा करिअरबाबत हा नविन उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणानंतर उपलब्ध नोकरीच्या संधी, तसेच परदेशी शिक्षणाच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाईन सल्ला देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

मुंबई :- पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणानंतर उपलब्ध नोकरीच्या संधी, तसेच परदेशी शिक्षणाच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाईन सल्ला देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

यासाठी https://careercounselling.mu.ac.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात लॉगिन करून विद्यार्थांना करिअरबद्दल असलेल्या शंकांचे समाधान करून घेता येईल. या ऑनलाईन समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यात वैयक्तिक माहिती, सध्या शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमांचा तपशील आदींची माहिती द्यायची आहे. नोंदणी यशस्वीरित्या केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News