मोहम्मद शमीच्या कुटुंबात कन्यारत्न 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • एकीकडे संघाचा  विजयी आनंद साजरा करत असताना त्याच्या आनंदात आणखी एक भर पडली आपल्या भावाला कन्यारत्न झाल्याची बातमी मिळताच मोहम्मद शमीचा आनंद गगनात मावेनासा  झाला.
  • त्याने लगेचच सोशल मीडियावर पोस्ट टाकत कन्यारत्न झाल्याची बातमी दिली.

मुंबई :भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने प्रतिस्पर्धी न्यूझीलंडवर ५-० ने  विजय मिळवला आणि संपूर्ण मालिकाच जणू खिशात घातली.

मात्र भारताच्या ह्या दणदणीत विजयामागे सिंहाचा वाटा  होता तो म्हणजे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचा. त्याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारतीय संघाला विजय संपादित करणे सुकर होत गेले आणि भारताने एकामागून एक असे सामने जिकंत मालिकेवर आपले नाव कोरले.

एकीकडे संघाचा  विजयी आनंद साजरा करत असताना त्याच्या आनंदात आणखी एक भर पडली आपल्या भावाला कन्यारत्न झाल्याची बातमी मिळताच मोहम्मद शमीचा आनंद गगनात मावेनासा  झाला. त्याने लगेचच सोशल मीडियावर पोस्ट टाकत कन्यारत्न झाल्याची बातमी दिली.

मोहम्मद शमीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपल्या बंधूना कन्यारत्न झाल्याची माहिती देऊन ट्विट केलं . भावाला कन्यारत्न झाल्याची गोड बातमी हि मोहम्मद शमीने आपल्या चाहत्यांसोबत तातडीने शेअर देखील केली  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News