अभियांत्रिकीची नवी वाट; हमखास मिळेल रोजगाराची साथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

भविष्यातील संधी आणि वर्तमानातील समस्या यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन शाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन शाखांना प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे.

मुंबई : अभियांत्रिकीच्या आयटी, मेकॅनिकल, इनेक्ट्रानिकल, इलेक्ट्रीक, प्रोडक्शन, सिव्हिल अशा विविध शाखा लोकप्रिय आहेत. विद्यार्थी अशा पारंपारीक शाखांकडे आकर्षित होताना दिसतात मात्र, आधुनिक काळात अभियांत्रिकीच्या नवनव्या शाखा उदयास येत आहेत. भविष्यातील संधी आणि वर्तमानातील समस्या यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन शाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन शाखांना प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. 50 जागेसाठी 500 ते 1 हजार विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासठी कसरत करावी लागते. मात्र या शाखेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराची हमखास संधी मिळते. आयआयटी, एनआयटी आणि खाजगी शिक्षण संस्था प्रशिक्षण घेत आहेत. इंजिनियर्स डे निमित्त नव्या शाखांची माहिती घेणार आहोत.

बायोमेडिकल इंजीनियरिंग

सध्या हेल्थकेअर सेक्टरला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान विकसित करून वैद्यकीय क्षेत्राला पुढे नेण्याचे महत्त्वपुर्ण कार्य मेडिकल इंजिनियर्सला करावे लागते. विद्यार्थ्यांना बायोलॉजिकल इंजीनियरिंगमध्ये इन्टूमेंट बनवण्याचे टेक्निक्स आणि बायोलॉजी सायन्स यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याचबरोबर इंन्टूमेटेशन सारख्या विषयात स्पेशलायझेशन असते. त्याचबरोबर कमी काळात लवकर इलाज करण्याचे तंत्रज्ञान कसे विकसित करावे याविषयी प्रशिक्षण दिले जाते. टेक्नॉलॉजी आणि मेडीकल यांचा सुयोग्य वापर करून वैद्यकीय क्षेत्रासाठी इंस्ट्रूमेंट बनवण्याचं कामे करावे लागते, भविष्यात कोठे संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे.

 • अभ्यासक्रमाचा कालावधी: दोन वर्ष 
 • अभ्यासक्रमाचे शुल्क : एक लाख 80 हजार रुपये 
 • प्रशिक्षण देणारी संस्था: एसआरएस विद्यापीठ

व्हर्च्युलर स्कायलाईन

विद्यार्थ्यांना आता एका वेगळ्या क्षेत्रात घेऊन जाणारी व्हर्च्युलर स्कायलाईन अभियांत्रिकी शाखा आहे. विमानाची टेस्टिंग करण्याचं काम या शाखेमार्फत चालते. पूर्वी विमानाचे डिझाईन तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष टेस्टिंग करण्याासाठी विमानात  बसून टेस्टिंग करावी लागायची, त्यामुळे अचानकपणे विमानात बिघाड झाल्यास पायलेटचा अपघात व्हायचा, तसेच विमानाचे आर्थिक नुकसान सुद्धा होत होते. आता एका जागी बसून कम्प्युटरद्वारे विमानाची टेस्टिंग करता येणार आहे, त्यामुळे फ्लाईट टेस्टर्स, मोशन सिस्टिम्स, व्हर्च्युलर रनवे वरील आणि डायनामिक सिस्टिमच्या मदतीने विमानाचा एअरफ्लो फोर्स,  प्रेशर एका जागेवर बसून टेस्ट करता येते. त्यामुळे सध्या या कोर्सला प्रचंड मागणी आहे लोकसंख्येच्या दुप्पट विमानाची आवश्यकता असते, त्यामुळे भविष्यात या क्षेत्राला प्रचंड स्कोप आहे. 

 • अभ्यासक्रमाचा कालावधी: तीन वर्ष 
 • अभ्यासक्रमाचे शुल्क : तीन लाख रुपये 
 • कुठे मिळेल प्रशिक्षण:  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस इंजीनियरिंग डेहराडून येथे मिळेल प्रशिक्षण

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग 

इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची एक विशेष शाखा म्हणून इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंगकडे पाहिले जाते. मेजरमेंट कंट्रोल आणि ऑटोमेशन संदर्भात विद्यार्थ्यांना शिकवले जाते. केमिकल, मेकॅनिकल, कंप्यूटर इंजीनियरिंगची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली जाते. त्याचबरोबर एवियोनिक्स,  एयरोनॉटिक्स, स्पेश सायन्स यांचे पार्ट बनवण्यास मदत करणे. उद्योग क्षेत्रातील पेट्रोल, केमिकल, थर्मल पावर प्लॉटसाठी वेगवेळे पार्ट बनवण्याचे काम इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्सला करावे लागते. भविष्यात या क्षेत्राला मोठी संधी उपलब्ध आहे.

 • अभ्यासक्रमाचा कालावधी: 1 वर्ष 
 • अभ्यासक्रमाचे शुल्क : 1 लाख रुपये प्रति सेमिस्टर
 • कुठे मिळेल प्रशिक्षण:  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभियांत्रिकी, विद्यापीठ

डिझाईन इंजिनीयर 

वेगवेगळ्या वस्तूंना एकत्र करून नवीन मॉडेल तयार करण्याचे प्रशिक्षण डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये दिले जाते. हावाई क्षेत्रात डिझाईन इंजिनीयर्सला अधिक महत्त्व आहे. विमानाचे वेगवेगळे डिझाईन करण्याचे काम डिझाईन इंजिनीयर करावे लागते. त्यामुळे मोठ्या कंपनीत भलेलठ्ठ पॉकेज मिळू शकते. लोकसंख्येच्या दुप्पट विमानाची आवश्यकता असचे त्यामुळे भविष्यात हवाई सेवा वाढणार आहे. आणि डिझाईन इंजिनीयर रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 • अभ्यासक्रमाचा कालावधी: 4 वर्ष 
 • अभ्यासक्रमाचे शुल्क : 90 रुपये प्रति सेमिस्टर
 • कुठे मिळेल प्रशिक्षण: भारतीय तंत्रज्ञान संस्था, नेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News