जीवनात घडणाऱ्या 'या' गोष्टी कधीही कोणाला सांगू नका...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी करायच असेल तर तुमच्या खाजगी गोष्टी "गुप्त" ठेवणे हे महत्त्वाचा असते. तसेच तुम्ही तुमच्या इतर गोष्टी कोणत्याही नातेवाईकाला सांगू नका. 

माणुस म्हटलं की आनंद आणि दु:ख हे येतंच. आपण भावनेच्या भरात आपल्या भावना जवळच्या व्यक्तीकडे चटकन व्यक्त करतो. भावणाप्रधान असंण हे माणसाला मिळालेलं वरदान आहे असे म्हटल जात. आताच्या जगामध्ये आई, वडिल, पत्नी, मुलं, मित्र, यांसारखे अजुनही कोणीतरी तुम्हाला तुमचं प्रिय असेल. अशा काही गोष्टी तुम्ही कोणाला कधीही सांगु शकत नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी करायच असेल तर तुमच्या खाजगी गोष्टी "गुप्त" ठेवणे हे महत्त्वाचा असते. तसेच तुम्ही तुमच्या इतर गोष्टी कोणत्याही नातेवाईकाला सांगू नका. 

या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका...

1. सुखी जीवनाचा मार्ग- 

आपण आपली कोणतीही गोष्ट कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सांगू नका. अश्या काही गोष्टी असतात ज्यांने आपल्या भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. भावनेच्या भरात आपण मित्रांमध्ये लगेचच ती गोष्ट बोलतो त्यामुळे आपल्याला भविष्यात धोका निर्माण होतो. भविष्यात येणाऱ्या अडचणी, संकट आपण सांगितल्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

2. दोघांच्या भांडणात तिसरा नको-

लग्नानंतर नवरा बायकोमध्ये भांडण हे होतच असतं पण त्यामध्ये कोणतरी दुसरा भांडणात आग लावण्याची काम करत असतो. मात्र, दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तीला समजलं तर मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. पतीपत्नीच्या वादात अनेकदा कुटुंबातील इतर व्यकती डोकावितात, मित्रमंडळी सल्ले देण्यासाठी पुढे येतात, मात्र हे वाद वाढू नये म्हणून आपणच ते सोडवून घ्यावे. त्यामुळे आपला सुखी संसार कायम सुखी रहावा असं वाटत असेल तर दोघांमधील भांडण कधीच तिसऱ्याला सांगू नका. 

3. दुखातही संयम ठेवा- 

जगात दु:ख हे सर्वांनाच असतं, तुम्ही कधी दु:ख नसलेला माणूस पाहिला आहे का? त्याच उत्तर नाही असच असेल. काहींना आजार असल्यामुळे ग्रासलेला असतो तर काहींना आर्थिक चणचण असते. काहींना मुलांच्या भविष्याची काळजी असते तर काहींना कौटुंबिक वाद सतावतो. मात्र तुमचं दु:ख कोणालाही सांगू नका. सध्या असलेली चिंता लवकरच दूर होईल असा विश्वास ठेऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. इतरांकडून तुम्हाला धीर दिला जाईल पण त्याची चर्चा गावभर होईल आणि भविष्यात वारंवार तुमचा कमकुवतपणाची चर्चा होईल हे लक्षात ठेवा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News