आत्मनिर्भर योजनेचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 15 May 2020

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि गरीब, मजूर, शेतकरी, लहान-मोठे उद्योग, दुकानदार आदी सगळ्यांच्या मदतीसाठी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. ही योजना "आत्मनिर्भर योजना' म्हणून ओळखली जाणार आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी जगभरात देशांनी लॉकडाऊन जाहीर केले; परंतु यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. आपल्या देशातही लॉकडाऊनचा फटका सर्वच स्तरांतील नागरिकांना बसला आहे. त्यात मजूर, कामगार, छोट्या उद्योजकांची आर्थिक कोंडी झाली आहे. या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर समाजमाध्यमांवर दररोज नेटकरी व्यक्त होत होते. फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून या वर्गाच्या हाल-अपेष्टा नेटकरी सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत होते.

बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि गरीब, मजूर, शेतकरी, लहान-मोठे उद्योग, दुकानदार आदी सगळ्यांच्या मदतीसाठी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. ही योजना "आत्मनिर्भर योजना' म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळे या योजनेची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमांच्या ट्रेंड्‌सप्रमाणे काही नेटकऱ्यांनी या योजनेच्या मीम्स, गमती-जमती शेअर केल्या. काही नेटकऱ्यांनी या योजनेचे गांभीर्य ओळखून आर्थिक बाबींवर चर्चा केली. त्यामुळे बुधवारी समाजमाध्यमांवर आत्मनिर्भर योजनेचाच बोलबाला असल्याचे दिसून आले.

बुधवारी आध्यात्मिक गुरू श्री श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस होता. "आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या माध्यमांतून ते जगभर ध्यान, प्राणायम आणि योगाचे महत्त्व अनुयायांपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे श्री श्री श्री यांचे अनुयायी जगभर आहेत. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त नेटकरी समाजमाध्यमांवर त्यांना शुभेच्छा देत होते.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर कोणती लस मिळतेय का? यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत. नेटकरीदेखील गुगलवर संशोधन होत असलेल्या लसींच्या माहितीबाबत शोध घेत आहेत. नेटकऱ्यांचा लसींविषयक माहिती शोधन्यामागचा हेतू हा आजार लवकर मानवी जीवनातून हद्दपार व्हावा, या आशेपोटी आहे. समाजमाध्यमांवरही लसींबाबत नेटकरी चर्चा करताना दिसतात. दिवस सरतासरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या "पॅकेज'वर नेटकरी बोलायला लगले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News