या तारखेपासून सुरु होणार NET परीक्षा; प्रवेशपत्र डाऊनलोड होत नसेल तर NTA ने दिला पर्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 20 September 2020

प्रवेश पत्रावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र देण्यात आले. प्रवेशपत्रात कोणताही बदल केला जाणार नाही असे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) परीक्षेचे प्रवेशपत्र शनिवारपासून (ता.19) उपलब्ध करुन देण्यात आले, उमेदवारांना https://ugcnet.nta.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावून प्रवेश डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करताना अडचणी आली तर उमेदवारांनी सकाळी 10. 00 ते सायंकाळी 5. 00 पर्यंत संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने केले. विद्यार्थ्यांच्या सर्व आडचणी हेल्पलाईन क्रमांकावर सोडवल्या जातील असे एनटीएने सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा 16- 25 सप्टेंबर दरम्यान आयोजिक केली होती, मात्र या कालावधीमध्ये इंडियन काऊन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च (ICAR) परीक्षा होणार आहे. सेट आणि आयसीएआर दोन्ही परीक्षा एकाच तारखेला असल्यामुळे नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आत नेट परीक्षा 24 सप्टेंबर नंतर घेतली जाणार आहे, त्यासाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले. प्रवेश पत्रावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र देण्यात आले. प्रवेशपत्रात कोणताही बदल केला जाणार नाही असे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

ज्युनियर रिसर्च फोलोशीप आणि प्राध्यापक होण्यासाठी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, 2018 पु्र्वी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) नेट परीक्षा कंडक्टर करत होती, सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नेट परीक्षा आयोजित केली जाते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले आहेत. त्यामुळे उमेदवरांनी मोकळ्या वातावणारत परीक्षा होणार आहे असे एनटीएने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News