नेस्ले इंडियाने भागवली पर्ये भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयालाची तहान... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयाला नेस्ले इंडिया लि., या कंपनीतर्फे  पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे उद्‌घाटन नुकतेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आले

पर्ये : पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयाला नेस्ले इंडिया लि., या कंपनीतर्फे  पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे उद्‌घाटन नुकतेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आले

सुरवातीला शिक्षिका रक्षमा साळकर व मनिषा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रार्थनागीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी नेस्ले कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर टप्पण भट्ट, कॉर्पोरेट अफेयर मॅनेजर मारिओ फर्नांडिस, श्री भूमिका शिक्षण संस्थेचे शंकर च्यारी, कुष्ठा राणे, भूमिका प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद वळवईकर, भूमिका हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नीता गावकर व इतर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. सदानंद हिंदे यांनी शब्दांनी स्वागत केले तर नेस्लेच्या अधिकारी अनुपा गावडे यांनी फळांची परडी देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी नेस्ले इंडियाच्या कंपनीने शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी आपल्या शरीराला असलेले पाण्याचे महत्त्व विशद केले. तसेच दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्त्व विशद केले. नेस्ले इंडियाचे  फॅक्टरी मॅनेजर  टप्पण भट्ट यांनी नेस्ले कंपनीबद्दल माहिती दिली. कॉर्पोरेट अफेयर मॅनेजर मारियो फर्नांडिस यांनी नेस्लेतर्फे देण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. दर सहा महिन्यांनी पाण्याची चाचणी करून घेतली जाईल. कोणताही बिघाड झाल्यास दुरुस्ती करून दिली जाईल.

कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर टप्पण भट्ट यांनी पाण्याचे शिक्षण असलेली माहिती पुस्तिका प्राचार्य डॉ. हिंदे यांच्याकडे भेट दिली. प्राचार्य डॉ. हिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांचा नेस्ले कंपनीचे कार्यकारी पुरवठा साखळी व्यवस्थापक दिगंबर शेटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनिषा गावस यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News