माणगावमध्ये पार पडला 'पडोस संसद' कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

आदिवासी युवक-युवतींशी संवाद वाढावा, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पडोस युवा संसदेने मार्गदर्शन शिबिर घेतले.

माणगाव : आदिवासी युवक-युवतींशी संवाद वाढावा, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पडोस युवा संसदेने मार्गदर्शन शिबिर घेतले. रुरल यंग फाऊंडेशन व नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारीला सायंकाळी विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उत्तेखोल माणगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

आदिवासी मुलांचे सक्षमीकरण आणि मानसिक, शैक्षणिक आलेख वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने युवा पडोस संसद या नावाने आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी कार्यक्रम झाला. यात तज्ज्ञ समुपदेशक आणि मार्गदर्शकांनी विनामूल्य मार्गदर्शन दिले. त्याचबरोबर आदिवासी मुलांच्या वाढत्या आत्महत्या आणि व्यसनाधीनता याविषयी चर्चा केली. प्रमुख पाहुणे म्हणून रिमा सावंत समुपदेशक, सुशील साईकर संस्थापक रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन, उत्तम पाटील मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अंकुश काळे व लामकुटे वर्गशिक्षक उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News