नेहा महाजनचा 'हा' व्हिडिओ देतोय चाहत्यांना 'जोर का झटका'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 March 2020

अभिनेत्री नेहा महाजन नेहमीच आपल्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबतच बॉलीवूडमध्येही नेहाने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नेहा महाजने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ साली 'मिडनाइट्स चिल्ड्रन' या चित्रपटापासून केली. त्याचप्रमाणे तिने तमिळ, मल्याळम या भाषेतील चित्रपटातही काम केले.बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्रींनपैकी नेहा एक आहे. तिचे अनेक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु यावेळी नेहाने आपल्या चाहत्यांना एक वेगळाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेहाचा वीणावादनाचा संगीतमय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री नेहा महाजन नेहमीच आपल्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबतच बॉलीवूडमध्येही नेहाने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नेहा महाजने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ साली 'मिडनाइट्स चिल्ड्रन' या चित्रपटापासून केली. त्याचप्रमाणे तिने तमिळ, मल्याळम या भाषेतील चित्रपटातही काम केले.बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्रींनपैकी नेहा एक आहे. तिचे अनेक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु यावेळी नेहाने आपल्या चाहत्यांना एक वेगळाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेहाचा वीणावादनाचा संगीतमय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नेहाने अतिशय सुंदर आणि मधुर असं वीणावादन केलं आहे. त्यामुळे नेहमीच बोल्ड अवतारात दिसणारी नेहाला या वेगळ्या रूपात बसून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल यात काही शंका नाही 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News