NEET 2020 परीक्षेची उत्तरतालिका विद्यार्थ्यांसाठी जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020
  • संपूर्ण देशावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन देखील करण्यात आले होते.
  • त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय देखील बंद होते.
  • त्यामुळे सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आले होत्या.

मुंबई :- संपूर्ण देशावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन देखील करण्यात आले होते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय देखील बंद होते. त्यामुळे सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आले होत्या. देशभरात करोना प्रादुर्भावाच्या काळात योग्य त्या आरोग्यविषयक खबरदारी सह नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. शनिवारी २६ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेची उत्तर तालिका जारी केली.

ज्या उमेदवारांनी नीट २०२० परीक्षा दिली, त्या उमेदवारांनी नीट २०२० ची उत्तरतालिका पडताळून पाहता येईल. ही उत्तरतालिका नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ntaneet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नीट २०२० ची उत्तरतालिका पाहू शकाल. याशिवाय या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरूनही विद्यार्थी उत्तरतालिका पाहू शकतील.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व सेट्ससाठी (E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6) उत्तरतालिका जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या आन्सर की, नुसार स्वत:च्या गुणांची पडताळणी करावी. अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

आन्सर की बाबत जर कोणाला काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्याबाबतची सविस्तर सूचना नंतर जारी केली जाईल. पण, सध्या कोणत्याही प्रकारचे मेल विद्यार्थ्यांनी करू नये, हरकतीं विषयीची स्वतंत्र सूचना करणयात येईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कळवले आहे.

सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. देशभरात ३,९०० पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही तीन तासांची पेन-पेपर परीक्षा दिली गेली. कोविड - १९ च्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले होते. परीक्षा २ वाजता सुरू झाली होती तरी, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात ११ वाजल्यापासून विविध स्लॉट्सनुसार बोलावण्यात आले होते. ही परीक्षा पूर्वी ३ मे रोजी होणार होती. ती कोविडमुळे दोन वेळा लांबणीवर पडली. आधी ती २६ जुलै रोजी होणार होती, पण करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन ती आणखी एकदा पुढे ढकलण्यात आली आणि १३ सप्टेंबर रोजी अखेरीस ती देशभरात पार पडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News